ETV Bharat / entertainment

Rocky Aur Rani kii Prem Kahaani : 'रॉकी और रॉनी...'मध्ये चालणार का करण जोहरची जादु? एकूण स्क्रिन्स, बजेटबद्दल अधिक जाणून घ्या..

author img

By

Published : Jul 25, 2023, 1:22 PM IST

Updated : Jul 25, 2023, 4:48 PM IST

करण जोहर सहा वर्षानंतर दिग्दर्शनात पदार्पण करत असलेला 'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग चित्रपटाच्या यशासाठी रांत्रदिवस प्रमोशन करत आहे.

Rani kii Prem Kahaani
रॉकी और रॉनी की प्रेम कहानी

मुंबई - रणवीर सिंग आणि आलिया भट्ट देशभर फिरुन 'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जंग जंग पछाडत असताना करण जोहरनेही अ‍ॅडव्हान्स बुकिंगची घोषणा केली आहे. करण जोहर या रोमँटिक चित्रपटाद्वारे सहा वर्षानंतर दिग्दर्शनात परतला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा एक महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. 'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' सध्या ट्रेंडिंगमध्ये असून चित्रपटाच्या प्रमोशनला प्रेक्षक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटातील 'तुम क्या मिले 'आणि 'व्हाट झुमका' या दोन गाण्यांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता 'धिंडोरा बाजे रे' हे नवे गाणे रिलीज झाले आहे.

'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग गली बॉय चित्रपटानंतर दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट तब्बल २५०० स्क्रिन्सवर भारतात रिलीज केला जाणार आहे. परदेशात ३०० स्क्रिन्सवर 'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' झळकणार आहे. या चित्रपटाचे बजेट १७८ कोटी इतके आहे, त्यामुळे २०० कोटी कमाई होत नाही तोवर हा चित्रपट हिट समजला जाणार नाही. यासाठी निर्माता आणि कलाकारांची टीम रात्रंदिवस प्रमोशनमध्ये गुंतले आहेत.

करण जोहरला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भरपूर शत्रू आहेत. या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळेल यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले असावेत. चित्रपटाचे रिव्हयू सकारात्मक येणे आवश्यक आहे. चित्रपटाभोवती कोणताही वाद निर्माण न होता सर्व काही सुरळीत पार पडले तर बॉक्स ऑफिसचा दरवाजा सहज उघडला जाईल. नकारात्मक रिव्हयूमुळे निर्माते नुकसानीत जातात याचा अनुभव वारंवार पाहायला मिळाला आहे.

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे दोघेही प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे कलाकार आहेत. शिवाय करण जोहरचा सिनेमाला मिळालेला रोमँटिक टच तरुण प्रेक्षकांना आकर्षित करु शकतो. चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस याठिकाणी साकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची सुरूवात चांगली झाली तर त्याचा लाभ पुढे अनेक दिवस होऊ शकतो.

धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यासारखे प्रतिभावान आणि ज्येष्ठ कलाकार चित्रपटात आहेत. 'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी'२८ जुलै रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

1. Bpbd Box Office Day 25 : 'बाईपण भारी देवा'ची वाटचाल ७५ कोटीकडे, 'वेड'चा विक्रमही मोडला

2. PRABHAS KALKI 2898 AD : 'प्रोजेक्ट के' लांबणीवर, 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेत 'मोठा' फेरफार

3. Kareena Kapoor vacation : करीना कपूरची युरोप सहल, शेअर केले मुलांसोबतचे सुंदर फोटो

Last Updated : Jul 25, 2023, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.