मुंबई - अजमेर ९२ या आगामी संवेदनशील विषयावरील चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. पुष्पंद्र सिंग यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राजस्थानमधील अजमेर शहरात घडलेल्या २५० बलात्कारांच्या विषयाभोवती फिरतो. यामध्ये दाखवण्यात आलंय की यातील पीडीत मुली या शालेय आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. यांचे शोषण आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्ती या शहरातील बलवान लोक आहेत. यामध्ये धार्मिक दंगलींचाही उल्लेख पाहायला मिळतो. ही कथा सत्य घटनेवर आहे अथवा नाही याबद्दल काही अद्याप समजलेले नाही. किंवा तसा दावा निर्मात्यांनी केलेला नाही. मात्र अजमेर शहारात १९९२ मध्ये अशी काही तरी घटना घडली होती का असा विचार टीझर पाहणाऱ्यांच्या मनात तयार होत आहे. फिल्म ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांना आपल्या ट्विटरवर हा टीझर शेअर केला आहे.
-
RELIANCE ENTERTAINMENT PRESENTS ‘AJMER 92’… TEASER OUT NOW… A #RelianceEntertainment presentation, #Ajmer92 will release in *cinemas* on 21 July 2023… Stars #KaranVerma, #SumitSingh, #BrijendraKala, #ZarinaWahab, #SayajiShinde and #ManojJoshi.
— taran adarsh (@taran_adarsh) July 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Teaser 🔗:… pic.twitter.com/S5jBMhjwTS
">RELIANCE ENTERTAINMENT PRESENTS ‘AJMER 92’… TEASER OUT NOW… A #RelianceEntertainment presentation, #Ajmer92 will release in *cinemas* on 21 July 2023… Stars #KaranVerma, #SumitSingh, #BrijendraKala, #ZarinaWahab, #SayajiShinde and #ManojJoshi.
— taran adarsh (@taran_adarsh) July 13, 2023
Teaser 🔗:… pic.twitter.com/S5jBMhjwTSRELIANCE ENTERTAINMENT PRESENTS ‘AJMER 92’… TEASER OUT NOW… A #RelianceEntertainment presentation, #Ajmer92 will release in *cinemas* on 21 July 2023… Stars #KaranVerma, #SumitSingh, #BrijendraKala, #ZarinaWahab, #SayajiShinde and #ManojJoshi.
— taran adarsh (@taran_adarsh) July 13, 2023
Teaser 🔗:… pic.twitter.com/S5jBMhjwTS
अजमेर ९२ चित्रपटाचा टीझर पाहताना पहिल्यांदा शहराचे दृष्य दिसते. एका मध्यम वर्गीय मुलीला एक धमकीवजा फोन येतो, असे फोन अनेकांना आल्याचे पुढे दिसते. घाबरलेल्या या मुली शोषणाच्या बळी ठरतात आणि आपल्या घरी याबद्दल बोलून जातात. त्यानंतर शहरात यावर चर्चा सुरू होते, कॉलेज बाहेर मुली निषेध नोंदवतात, हा प्रकार १९८७ पासून सुरू असल्याचा उल्लेख ऐकायला मिळतो. यात काही मुलींचा मृत्यूही होतो. याचे वार्तांकन ज्या प्रकारे होते त्यातून धार्मिक तेढ वाढण्याचा मुद्दा तयार होऊ लागतो आणि मुलींच्या जीवा पेक्षा धार्मिक दंगलीचा विषय महत्त्वाचा बनतो.
या चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता मनोज जोशी, सयाजी शिंदे, ब्रिजेन्द्र काला, राजेश शर्मा, झरीना वहाबसह करण वर्मा आणि शालिनी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन फारसे दिसत नाही. शिवाय याच्या प्रदर्शनाची तारीख २१ जुलै आहे. त्यामुळे हा चित्रपट देशभर वितरीत होणार का याबद्दलही शंका वाटते. रिलायन्स एंटरटेन्मेट प्रेझेन्ट करत असलेल्या अजमेर ९२ चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर रिलीज करण्यात आलाय. प्रेक्षकांनी याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही.
हेही वाचा -
१. Mi 7 Opening Day Collection: 'मिशन इम्पॉसिबल ७' चा भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ
२. Ask Srk : शाहरुख खानवर झाली प्रश्नांची सरबती, उत्तराने जिंकली चाहत्यांची मने