ETV Bharat / entertainment

Bholaa second teaser: अजय देवगणचा धडाकेबाज भोला चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज

अजय देवगणने मंगळवारी त्याचा आगामी चित्रपट भोलाचा दुसरा टीझर प्रदर्शित केला. १ मिनीट ५२ सेकंदाचा हा टीझर प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालेला आहे.

भोला चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज
भोला चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज
author img

By

Published : Jan 24, 2023, 12:49 PM IST

मुंबई : अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अजय देवगणने मंगळवारी त्याच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट भोलाचा दुसरा टीझर अनावरण केला. अजयने त्याच्या आगामी अॅक्शन चित्रपटाची एक नवीन झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. भोलाच्या लेटेस्ट टीझरमध्ये एक धडाकेबाज अजय दाखवण्यात आला आहे जो तीव्र अॅक्शन अवतारात दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कैथीचा अधिकृत हिंदी रिमेक : आधी कळवल्याप्रमाणे, भोला हा तामिळ हिट कैथीचा अधिकृत हिंदी रिमेक आहे आणि अजयने त्याचे दिग्दर्शन केले आहे. एका रात्रीत रचलेल्या एका माणसाच्या लढ्याची कथा अशी स्टाईलबद्ध केली गेली आहे, ज्यात भोला मानवी आणि इतर कोणत्याही स्वरूपात शत्रूंच्या समूहाशी लढा देताना दिसत आहे. अजयच्या मुख्य भूमिकेत, चित्रपटात तब्बू, संजय मिश्रा, दीपक डोब्रिअल, राय लक्ष्मी आणि मकरंद देशपांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

टीझर गुंतवून ठेवण्यात यशस्वी : जो बाप मुलीला एक बाहुली देऊ शकला नाही, तो आता एका रात्रीत जग देण्याचं विचार करतोय, या हिंदी डायलॉगसह अस्वस्थ झालेला अजय देवगण टीझरच्या सुरुवातील दिसतो. त्यानंतर प्रचंड वेगवान हलचालीसह अ‍ॅक्शन पडद्यावर आपण पाहतो. त्यानंतर, लोक हे का विसरतात की या वर्दीच्या मागेही एक माणूस असतो, असा हिंदीतील संवाद तब्बूच्या तोंडी आहे. यात तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. १ मिनीट ५२ सेकंदाचा हा टीझर आपल्या गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालेला आहे.30 मार्च 2023 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद : कैथी हा मूळ चित्रपट एका माजी दोषी व्यक्तीभोवती फिरतो जो आपल्या मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी जात आहे. त्याच्यासोबत एक जखमी पोलीस अधिकारी असतो आणि तो त्याच्या ठरलेल्यास्थानी पोहोचण्यापूर्वी त्याला ड्रग लॉर्ड्सच्या टोळीचा सामना करावा लागतो. मूळ तमिळ लोकेश कनागराज दिग्दर्शित, चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि बॉक्स ऑफिसवर चांगले काम केले होते.

भोला हा अजय देवगणचा दिग्दर्शक म्हणून चौथा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने 2008 मध्‍ये यू, मी और हम, 2016 मध्‍ये शिवाय, आणि 2022 मध्‍ये रनवे 34 हे चित्रपट केले होते. त्यानंतरचा अजयचा हा चौथा दिग्‍दर्शक म्हणून चित्रपट आहे. सुपरहिट दृष्‍यम 2 दिल्‍यानंतर भोला हा अजयचा पहिला चित्रपट असेल. दृष्म २ ने बॉक्‍स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली. तो निर्माता बोनी कपूरच्या आगामी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट मैदान याशिवाय दिग्दर्शक नीरज पांडेच्या आगामी चित्रपटात आणि रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये दीपिका पदुकोणच्या विरुद्ध दिसणार आहे.

हेही वाचा - Vicky Kaushal As Chhatrapati Sambhaji : छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीत बनणार भव्य चित्रपट, विकी कौशल साकारणार राजेंची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.