ETV Bharat / entertainment

Bhola movie trailer released : अजय देवगणचा बहुप्रतीक्षित भोला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज - Bhola movie trailer released

अजय देवगणने त्याच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट भोलाचा ट्रेलर अखेर रिलीज केला आहे. या अ‍ॅक्शन चित्रपटाचा हा ट्रेलर जबरदस्त डायलॉगबाजी, नेत्रदिपक स्टंट्स आणि गुंतवून ठेवणारे रहस्य यामुळे उत्कंठा वाढवणारा आहे.

अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट भोलाचा ट्रेलर अखेर रिलीज

author img

By

Published : Mar 6, 2023, 2:45 PM IST

मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अजय देवगणने त्याच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट भोलाचा ट्रेलर अखेर रिलीज केला आहे. त्याच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटाचा हा ट्रेलर जबरदस्त डायलॉगबाजी, नेत्रदिपक स्टंट्स आणि गुंतवूण ठेवणारे रहस्य यामुळे उत्कंठा वाढवणारा आहे. यापूर्वी चित्रपटाचे दोन टीझर रिलीज झाले होते. त्यामुळे वाढलेल्या उत्कंठेत ट्रेलरमुळे आणखी भर पडली आहे. भोलाच्या लेटेस्ट ट्रेलरमध्ये एक धडाकेबाज अजय दाखवण्यात आला आहे जो जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहे.

कैथी चित्रपटाचा हिंदी रिमेक : भोला हा तामिळ हिट चित्रपट कैथीचा अधिकृत हिंदी रिमेक आहे आणि अजयने त्याचे दिग्दर्शन केले आहे. एका रात्रीत घडलेल्या एका माणसाच्या आक्रमक लढ्याची कथा यात स्टाईलबद्ध केली गेली आहे, ज्यात भोला हा साहसी व्यक्ती मानवी आणि इतर कोणत्याही स्वरूपात शत्रूंच्या समूहाशी लढा देताना वीरासारखा दिसत आहे. अजय देवगण चित्रपटात मुख्य भूमिकेत असून तब्बू, संजय मिश्रा, दीपक डोब्रिअल, राय लक्ष्मी आणि मकरंद देशपांडे खास भूमिकेत झळकले आहेत.

ट्रेलर पाहून आपल्याला एका मुलीच्या भेटीसाठी आतुर झालेला बाप समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर कसा मात करतो हे पाहायला मिळते. अस्वस्थ झालेला अजय देवगण सुरुवातील दिसतो. त्यानंतर प्रचंड वेगवान आणि आक्रमक हलचालीसह अ‍ॅक्शन घडताना आपण पडद्यावर पाहतो. या चित्रपटात अभिनेत्री तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. हा ट्रेलर आपल्या कथेत गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालेला आहे. 30 मार्च 2023 रोजी बोला हा हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

कैथी हा तमिळ मूळ चित्रपट जो एका माजी दोषी असलेल्या कैदी व्यक्तीभोवती फिरतो जो आपल्या मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी निघाला आहे. त्याच्यासोबत एक जखमी पोलीस अधिकारी असतो जे त्याला त्याच्या ठरलेल्यास्थानी पोहोचण्यापूर्वी त्याचा ड्रग माफियाच्या टोळीशी सामना होतो. मूळ तमिळ चित्रपट हा लोकेश कनागराज दिग्दर्शित असून चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

हेही वाचा - Karthik Aaryan's Deshi Holi : कार्तिक आर्यनची परदेशात देशी होळी, हजारो चाहत्यांसोबत डल्लासमध्ये उधळला रंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.