मुंबई - Auron Mein Kahan Dum Tha Release Date : अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू स्टारर 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाची रिलीज डेट आता समोर आली आहे. चाहत्यांना अजय आणि तब्बूची जोडी खूप आवडते. 'दृश्यम 2' नंतर अजय देवगण आणि तब्बू पुन्हा एकदा नव्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. नीरज पांडे दिग्दर्शित 'औरों में कहाँ दम था' हा चित्रपट रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बूची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. नीरज पांडेनं त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत लिहिलं, ''तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची वाट पाहत आहे'. अजय आणि तब्बूचा हा चित्रपट पुढील वर्षी 26 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.''
अजय आणि तब्बू दिसणार एकत्र : याआधी अजय देवगणनं 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाची घोषणा केली होती. 5 डिसेंबर रोजी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर पोस्ट करताना, त्यानं लिहिलें की, "मी नीरज पांडेसोबत माझ्या सहकार्याची घोषणा करत आहोत." यानंतर त्याचे चाहते चांगलेच उत्साहित झाले होते. त्याच्या या पोस्टवर अनेकजणांनी कमेंट करून त्याला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. नीरज यांनी यापूर्वी 'अ वेन्सडे', 'स्पेशल 26' आणि 'धोनी : द अनटोल्ड स्टोरी' यासारखा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अजय आणि तब्बूचा हा चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
वर्कफ्रंट : 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी यासारखे दिग्गज कलाकार आहेत. 'और में कहां दम था' हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाला मूळ साउंडट्रॅक संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी दिला आहे. अजय देवगण आणि तब्बू वर्कफ्रंटवर बोलायचं झालं तर, अजय हा 'सिंघम 3', 'गोलमाल 5' , दे दे प्यार दे 2 आणि 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे तब्बू 'द क्रू'मध्ये दिसेल.
हेही वाचा :