ETV Bharat / entertainment

जयपूर पिंक पँथर्सला चिअर करण्यासाठी पोहचले बच्चन कुटुंब - बच्चन कुटुंब केलं चिअर

Pro Kabaddi league match: बच्चन कुटुंब प्रो कबड्डी लीग सामन्यात कबड्डी संघ जयपूर पिंक पँथर्सला चिअर करण्यासाठी पोहोचले. या सामान्यादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Pro Kabaddi league match:
प्रो कबड्डी लीग सामना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 3:25 PM IST

मुंबई - Pro Kabaddi league match : प्रो कबड्डी लीग सामाना सध्या सुरू आहेत. एनएससीआयने आयोजित केलेल्या मुंबईतील डोममध्ये बच्चन कुटुंबातील काही सदस्य जमले होते. अभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सला प्रोत्साहन देण्यासाठी अभिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चनसह आराध्या देखील पोहचले होती. हा संघ आधीच गतविजेता होता. दरम्यान शनिवारी प्रो कबड्डी लीग पीकेएल सीझन 10च्या सामन्यात पिंक पँथर्सनं 'यू मुंबा'ला 41-31नं पराभूत केलं. आता एक ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि आराध्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बच्चन कुटुंब खूप उत्साहित दिसत आहे. व्हिडिओमध्ये बच्चन कुटुंबातील सदस्यांनी पिंक पँथर्सला प्रोत्साहित करण्यासाठी ब्लू ट्रॅकसूट घातला आहे.

बच्चन कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये अभिषेक, ऐश्वर्या, अमिताभ बच्चन आणि आराध्या हे पिंक पँथर्स प्रोत्साहन देत असून या संघाचा जयजयकार करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या कमेंट विभागात एका चाहत्यानं लिहिलं, ''मी घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांना कोपऱ्यात रडताना ऐकू शकतो.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'थँक गॉड टेन्शन दूर झालं. अशा अफवांबद्दल ऐकणे खूप वाईट आहे, विशेषतः ऐश्वर्यासाठी. देव बच्चन परिवाराला आशीर्वाद देवो.'' आणखी एका यूजरनं लिहिलं, ''आनंदी कुटुंब पाहणे खूप छान आहे.'' अशा अनेक कमेंट्स या फोटोवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

भव्य प्रीमियर : बच्चन कुटुंबासाठी 2023 हे वर्ष खूप चांगले होते. अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदानं झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या संगीतमय चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर मुंबईत झाला. या प्रीमियरला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होते. आराध्यानं देखील तिच्या शाळेच्या वार्षिक समारंभात सुंदर कामगिरी केली. ज्यावर तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांनी तिचे कौतुक केले होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाचा विषय हा खूप चर्चेत होता, मात्र आता या अफवांना पूर्णविराम लागला आहे.

हेही वाचा :

  1. टायगर 3 'या'ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज
  2. महेश बाबूचा 85 फूट कट आऊट, 'गुंटूर कारम' होणार 'या' दिवशी रिलीज
  3. 'डंकी'च्या सक्सेस पार्टीमधील शाहरुख खान राजकुमार हिरानी आणि अनिल ग्रोवरचे फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.