मुंबई : 'गदर २' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप धुमाकूळ घालत आहे. सनी देओल हा २२ वर्षांनंतर 'तारा सिंह' अवतारात परतत आहे. सनी या अवतारात यापूर्वी प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता देखील सनीला रुपेरी पडद्यावर खूप जास्त पसंत केले जात आहे. 'गदर २'ने ८ दिवसांत ३०० कोटींहून अधिक देशांतर्गत कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत पैसा छापत आहे. दरम्यान 'गदर २'चे निर्माते आणि स्टारकास्ट चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. आता 'गदर २'च्या यशादरम्यान, सनी देओल, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ स्टारर ब्लॉकबस्टर 'बॉर्डर' चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. 'गदर २'चे यश बघता 'बॉर्डर'चे दिग्दर्शक जे पी दत्ता हे 'बॉर्डर २'च्या तयारीला लागले आहेत.
'बॉर्डर २'ची घोषणा लवकरच : मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर' चित्रपटाचे दिग्दर्शक जे पी दत्ता 'गदर २' चित्रपटाला मिळालेल्या जोरदार यशानंतर 'बॉर्डर २' चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. 'बॉर्डर' चित्रपट १९९७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. 'बॉर्डर' चित्रपटात सनी देओलने एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये सनी देओल व्यतिरिक्त सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, पुनीत इस्सार आणि अक्षय खन्ना यांच्यासह अनेक स्टार्सनी उत्तम अभिनय केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत 'बॉर्डर'ला खूप यश मिळाले होते. 'गदर २'चा कमबॅक झाल्यानंतर 'बॉर्डर'च्या निर्मात्यांनी सनी देओलचे मोठे पुनरागमन पाहून २६ वर्षांनंतर 'बॉर्डर २'ची तयारी सुरू करण्याचा विचार केला आहे.
'बॉर्डर-२' सनी देओल दिसणार मुख्य भूमिकेत : 'बॉर्डर २'बद्दल गेल्या ३ वर्षांपासून चर्चा सुरू होत्या. आता 'गदर २'चे यश पाहता 'बॉर्डर २'ची लवकरच घोषणा होणार आहे. 'बॉर्डर २'ची कहाणी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असणार आहे. त्याचबरोबर सनी देओलसोबत 'बॉर्डर २' मध्ये नव्या पिढीतील कलाकार देखील दिसणार आहेत. सनी देओल 'बॉर्डर २' मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :