ETV Bharat / entertainment

Katrina Kaif : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानंतर कतरिना कैफ 'मॉर्फ'च्या जाळ्यात - कतरिना कैफचा फोटो

Katrina Kaif : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानंतर अभिनेत्री कतरिना कैफचा मार्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हा फोटो तयार करण्यात आला आहे.

Katrina Kaif
कतरिना कैफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 7:07 PM IST

Updated : Nov 29, 2023, 12:48 PM IST

मुंबई Katrina Kaif : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ मॉर्फिंगच्या जंजाळात अडकली आहे. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कॅटचा 'टायगर 3'मधील 'टॉवेल सीन' दिसत आहे. डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं कोणीतरी तिला टॉवेलऐवजी लाजिरवाणे कपडे जोडल्याचं या फोटोमध्ये दाखविण्यात आलं आहे. कॅटचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'टायगर 3' च्या ट्रेलरमध्ये कतरिना कैफची टॉवेल फाईट प्रेक्षकांना आवडली. यासाठी तिचं सोशल मीडियावर देखील खूप कौतुक झालं होतं. कॅटनं टॉवेल लपेटून अगदी आरामात सीन शूट केला होता. आता काही दिवसापूर्वीच तिनं तिच्या इंस्टाग्राम पेजवर टॉवेल फाईट सीनचा शूट सुरू असतानचे फोटो पोस्ट केले होते. आता याचं फोटोला मॉर्फ केलं गेलं आहे.

कतरिनाचा फोटो व्हायरल : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 'टायगर 3' च्या 'टॉवेल सीन'मधील कतरिना कैफच्या डीपफेक फोटोमध्ये, तिनं पांढरा डीप प्लंगिंग नेकलाइन टॉप घातलेला दिसत आहे. यात तिची क्लीवेज खोलवर दिसत आहे. याउलट कतरिनानं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिनं एक टॉवेल लपेटला आहे, ज्यामध्ये तिची नेकलाइन पूर्णपणे झाकलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती चांगलीच दिसत आहे. मात्र डीपफेक फोटो हा अश्लील असल्याचं दिसत आहे. कतरिनाच्या आधी रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती एक्स्ट्रा रिव्हीलिंग ड्रेस घालून लिफ्टमधून बाहेर येताना दिसते. हा व्हिडिओ ब्रिटीश सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झारा पटेलचा होता. ज्यामध्ये रश्मिकाचा चेहरा मॉर्फ करण्यात आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर झारानं याबद्दल प्रतिक्रिया दिली होती आणि या प्रकरणात तिचा कोणताही सहभाग नसल्याचा दावाही केला होता.

'टायगर 3' कधी रिलीज होणार : 'टायगर 3' च्या रिलीजला फक्त 5 दिवस उरले आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर चित्रपट 'टायगर 3'मध्ये शाहरुख खान कॅमिओ देखील दिसणार आहे. या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

हेही वाचा :

  1. Don 3 Update : रणवीर सिंगसोबत 'डॉन 3'मध्ये जंगली बिल्लीचीही होणार एंट्री ?
  2. Elvish Yadav Snake Venom Case: एल्विश यादव मेनका गांधी यांच्यावर मानहानीचा खटला करणार दाखल
  3. Kamal Haasan Birthday : 'तुम्हाला पाहात मोठं झालोय', म्हणत प्रभासनं दिल्या कमल हासनला शुभेच्छा

Last Updated : Nov 29, 2023, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.