ETV Bharat / entertainment

virat kohli : 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीनं दिली विराट कोहलीच्या डान्सवर प्रतिक्रिया - भारत आणि दक्षिण आफ्रिका

virat kohli : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक सामन्यात विराट कोहलीनं डान्स करून सर्वांचे मनोरंजन केलं. आता त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीनं त्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

virat kohli
विराट कोहली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 11:42 AM IST

मुंबई - virat kohli : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक सामन्यात विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर शतक झळकावलं. सामन्याच्याच दिवशी त्याचा 35 वा वाढदिवस असल्यानं त्याने चाहत्यांना आपल्या शतकाचं 'रिटर्न गिफ्ट' दिलं. त्यानं 121 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. या खेळीमुळं टीम इंडियानं 50 षटकांत 5 विकेट गमावत 326 धावा करता आल्या. या सामन्यादरम्यान कोहलीची विनोदबुद्धीची पुन्हा एकदा प्रचिती आली. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पाचव्या षटकानंतर विराट मैदानावर नाचताना दिसला. विराटनं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील गाण्यावर डान्स केला.

विराट कोहलीनं केला डान्स : सहावं षटक सुरू होण्यापूर्वी मैदानावर शाहरुखचं 'चलेया' हे गाणं वाजले. विराटनं हे गाणे ऐकल्यानंतर त्याचे पाय थिरकायला लागले आणि तो नाचू लागला. शेवटी त्यानं शाहरुख खानप्रमाणे हात पसरून प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या विराटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारतानं 234 धावांनी विजय मिळवल्यानं हा सामना एकतर्फी ठरला. विराटनं फिल्डींगदरम्यान पत्नी अनुष्का शर्माच्या 'ऐनवाई ऐनवाई' या गाण्यावर देखील डान्स केला. विश्वचषक 2023 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग 8वा विजय नोंदवला. क्रिकेटच्या मैदानावरच त्याच्या चाहत्यानं देखील सेलिब्रेशनचा आनंद लुटला.

विराटच्या डान्सवर अ‍ॅटलीनं दिली प्रतिक्रिया : दरम्यान, शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामधील 'चलेया' गाण्यावर त्याचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला. जेव्हा हे गाणं मैदानावर वाजलं तेव्हा विराटनं शाहरुखची सिग्नेचर पोझ देत गाण्यावर डान्स केला. हे पाहून 'जवान'चे दिग्दर्शक अ‍ॅटलीनं यावर प्रतिक्रिया दिली. त्यानं एक्सवर पोस्ट करत लिहिलं 'ओह माय गॉड'. विराट मैदानावर खूप मनोरंजन करणारा आहे. त्याच्या शानदार खेळीव्यतिरिक्त, त्याला स्वतःला आणि खेळाडूंना कसे आनंदित करायचे हे त्याला माहित आहे. दरम्यान, अनुष्का पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र अद्याप दोन्ही बाजूंनी अधिकृत काहीही आलेले नाही.

हेही वाचा :

  1. Vikrant Massey Interview :'12th Fail'चा नायक विक्रांत मॅसीही झाला होता नापास, प्रेरणादायी व्यक्तींची सांगितली नावं
  2. Anushka Sharma on Virat Kohli : 'विराट' खेळीनंतर नवऱ्यासाठी अनुष्का शर्माची खास पोस्ट; बर्थडे पर खुद को...
  3. Randeep and Lin Wedding: रणदीप हुड्डा लवकरच करणार गर्लफ्रेंड लिन लैश्रामशी लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.