मुंबई - Malti Marie and Nick Jonas : ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्या घरी गेल्या वर्षी जानेवरीमध्ये पहिल्यांदा पाळणा हालला. त्यांच्या संसारवेलीवर मालती मेरी ही चिमुकली कळी उमलली. तेव्हापासून जोडपं आपल्या लेकीसोबत खूप आनंदी क्षण घालवत असतात. बऱ्याचदा लेकीसोबतचे सुंदर फोटोही ते शेअर करतात. अलिकडेच जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टसाठी प्रियंका चोप्रा मुलगी मालती मेरीसह हजर होती. हा व्हिडिओ आता इंडटरनेटवर तुफान व्हायरल झालाय.
इंस्टाग्रामवर एका चाहत्यानं 'द जोनास ब्रदर्स'च्या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ शेअर केलाय, या कार्यक्रमामध्ये प्रियांका आणि मालती प्रेक्षकांमध्ये हजर होते. त्यावेळी निक जोनास मंचावर 'व्हेन यू लुक मी इन द आईज' हे गाणं परफॉर्मन्स करत होता. तेव्हा समोरच्या पाहल्या रांगेत प्रियांकासोबत उभी असलेल्या मालती मेरीकडे आला आणि मालतीचा हात धरण्यासाठी खाली झुकला आणि तिच्या डोक्याचं चुंबन घेतलं. मुलीसाठी निक जोनासनं टाकलेलं हे पाऊल उपस्थित हजोरो प्रेक्षकांना खूप आवडलं व सर्वांनी जल्लोष केला.
निक जोनासच्या या इव्हेन्ट प्रसंगी प्रियांका चोप्रानं गुलाबी रंगाचा वन-पीस ड्रेस निवडला होता आणि त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्यासोबत स्लिंग बॅग देखील तिनं घेतली होती. प्रियांकाने तिच्या मुलीला गुलाबी रंगाचा हेडफोन घातलेल्या शुभ्र पांढऱ्या पोशाखात सजवलं होतं. इव्हेंटमधील एका व्हिडिओमध्ये, चिमुकली मालती मेरी तिच्या वडिलांच्या समर्थनार्थ टाळ्या वाजवताना आणि हात हलवताना दिसतेय, तर दुसऱ्यामध्ये, लहान मुंचकिन तिचा काका जो जोनासला हाय-फाइव्ह देताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर लगेचच, नेटिझन्सनी कमेंट विभागात प्रतिक्रियांचा वर्षाव केला. एका यूजरने लिहिले की, 'त्या गुलाबी पोशाखात प्रियंका खूप सुंदर दिसत आहे'. दुसर्यानं जो जोनासचं कौतुक केलं आणि लिहिलं, 'अव्वा!! खूप गोड! तो एक गोड जो काका आहे.' एका चाहत्याने कमेंट केली, 'आज तिला (मालती) तिच्या कुटुंबाकडून सर्व प्रेम मिळालंय. ती खूपच सुंदर आहे.'
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिच्या सर्वात अलीकडील प्रोजेक्ट्समध्ये 'लव्ह अगेन' आणि OTT सिरीज 'सिटाडेल'चा समावेश आहे.
हेही वाचा -
2. Vrushabha Shoot : शनाया कपूरनं शेअर केला मोहनलाल आणि 'वृषभ' चित्रपटाच्या स्टार कास्टसोबत फोटो