ETV Bharat / entertainment

Adipurush dialogue controversy : 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या संवादांवर तीव्र टीका झाल्यानंतर, चित्रपट निर्मात्यांनी केली महत्वपूर्ण घोषणा

'आदिपुरुष' या चित्रपटाच्या संवादांवर तीव्र टीका झाल्यानंतर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली की ते चित्रपटाच्या संवादांमध्ये पुन्हा सुधारणा करतील.

Adipurush dialogue controversy
आदिपुरुष डायलॉग विवाद
author img

By

Published : Jun 19, 2023, 11:36 AM IST

मुंबई : आदिपुरुष हा चित्रपट 16 जूनला रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाला समिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र आता या चित्रपटाला संपूर्ण देशातून विरोध केला जात आहे. या चित्रपटाला असा विरोध होत असल्याने आता चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांनी रविवारी काही महत्वपूर्ण बाब या चित्रपटाबाबत केली आहे. त्यांनी सांगितले, की 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील 'काही संवादांमध्ये सुधारणा' करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटामधील संवादामुळे देशातून या चित्रपटावर जोरदार टीका केली जात आहे.

  • रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
    सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
    आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
    उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…

    — Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आदिपुरुष वादाच्या भोवऱ्यात : आदिपुरुषमधील हिंदी संवाद आणि गाणी लिहिणारे शुक्ला यांनी सांगितले, या आठवड्यापर्यंत चित्रपटामधील संवादांमध्ये सुधारणा होईल. त्यांनी ट्विटर अकाऊंटवर याबाबत निवेदनात म्हटले, ' माझ्यासाठी तुमच्या भावनांपेक्षा मोठे काहीही नाही. मी माझ्या संवादांच्या बाजूने अगणित युक्तिवाद देऊ शकतो, परंतु यामुळे तुमची वेदना कमी होणार नाही. मी आणि चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकाने ठरवले आहे की आम्ही काही संवादांमध्ये सुधारणा करू. जे संवाद तुम्हाला दुखावत आहेत ते आम्ही बदलवू आणि ते या आठवड्यात चित्रपटात जोडल्या जाईल'. असे त्यांनी लिहले.

देशभरात आदिपुरुष या चित्रपटाला विरोध : शुक्रवारी देशभरात हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळमध्ये प्रदर्शित झालेल्या आदिपुरुषमध्ये प्रभासने राघव (राम), क्रिती सेनन जानकी (सीता) आणि सैफ अली खान लंकेश (रावण) च्या भूमिकेत आहेत. ओम राऊत दिग्दर्शित आणि टी-सिरीज् द्वारे निर्मित, हा चित्रपट बिग-बजेटचा आहे. आदिपुरुष या चित्रपटाला खराब व्हिएफएक्समुळे सोशल मीडियावर ट्रोल याआधी करण्यात आले होते. बोलक्या संवादांत, लंका दहन करतानच्या भगवान हनुमानाच्या संवादांसाठी शुक्ला यांच्यावर टीका करण्यात आली आहे.अनेक प्रेक्षक आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देवदत्त नागे यांनी साकारलेल्या पात्रांनी, विशेषत: बजरंग (हनुमान) द्वारे वापरलेली अतिसरळ भाषा निदर्शनास आणून दिली. शुक्लाने त्यांच्या विधानात, म्हटले की, तीन तासांच्या चित्रपटात त्यांनी '3 मिनिटांच्या कालावधीसाठी कल्पनेपेक्षा काहीतरी वेगळे' लिहिले आहे, मात्र प्रेक्षकांनी याला लेबल लावण्याची घाई करू नये. 'सनातन द्रोही'.

रिलीजच्या पहिल्या दिवशी कमाविले 140 कोटी : 'रामकथेतून पहिला धडा शिकता येतो तो म्हणजे प्रत्येक भावनेचा आदर करणे. काळाबरोबर खूप काही बदलते, पण भावना ही कायम असते. मी आदिपुरुषमध्ये संवाद ४,००० हून अधिक ओळी लिहिल्या, त्यातील पाच ओळींवर काहीजणांच्या भावना दुखावल्या. त्या शेकडो ओळींमध्ये, जिथे श्रीरामाचा गौरव करण्यात आला होता, माँ सीतेच्या पावित्र्याचे वर्णन केले गेले होते, मी त्यांच्याकडून स्तुतीची अपेक्षा करत होतो, जे मला का मिळाली नाही. पुढे ते म्हणाले. 'मला प्रेक्षकांबद्दल कोणतीही तक्रार नाही. 'आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो तर सनातनचा पराभव होईल. सनातन सेवेसाठी आम्ही आदिपुरुष बनवला आहे. हा एक असा चित्रपट आहे जो तुम्ही मोठ्या संख्येने पहात आहात आणि मला विश्वास आहे की तुम्ही भविष्यातही पहाल,' असे त्यांनी म्हटले. 500 कोटी रुपयांच्या बजेटवर बनलेल्या, आदिपुरुष या चित्रपटाने शुक्रवारी रिलीजच्या पहिल्या दिवशी 140 कोटी रुपये कमाविले , असा दावा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. Demand To Ban Adipurush: संपूर्ण देशात 'आदिपुरुष' या चित्रपटावर बंदीची मागणी, भाजप नेत्यांनीही केला निषेध
  2. Controversy on adipurush : 'आदिपुरुष'वर लेखक मनोज मुंतशीर यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा चित्रपट...'
  3. Adipurush box office day 1: पठाणचा विक्रम मोडत आदिपुरुषने पहिल्या दिवशी केली सर्वोच्च कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.