ETV Bharat / entertainment

अभिनेता कमाल खानचा जेलमधील मुक्काम वाढला, आजही जामीन अर्जावर सुनावणी नाही - Kamal Khan bail application hearing

वादग्रस्त अभिनेता कमाल आर खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. कमाल खानच्या वकिलांनी पुढील सुनावणी बुधवारी होणार असल्याचे सांगितले. वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी अटक केली होती.

Etv Bharat
अभिनेता कमाल खान
author img

By

Published : Sep 5, 2022, 4:40 PM IST

मुंबई - अभिनेता कमाल खान यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. आजही जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. कमाल खानच्या वकिलांनी पुढील सुनावणी बुधवारी होणार असल्याचे सांगितले. वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी अटक केली होती.

मालाड पोलिसांनी अटक केल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी कमाल खानलाही ताब्यात घेतले असून, कमाल खानला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यातील प्रकारणाची सुनावणी उद्या न्यायालयात होणार आहे.

कमाल खानचे वादग्रस्त ट्विट - कमाल खानने अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या 2020 मध्ये झालेल्या मृत्यूबाबत अपमानास्पद ट्विट केले होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राहुल कनाल यांनी कमालच्या या वादग्रस्त ट्विटबाबत मुंबई पोलिसांत कमाल विरोधात तक्रार केली होती. पोलिसांनी कमाल खानवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र कमाल खान परदेशात असल्याने त्याच्यावर कारवाई होऊ शकली नाही, मात्र कमाल खान मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली होती.

असे केले होते वादग्रस्त ट्विट - कमाल खान आपल्या वादग्रस्त भाषेमुळे नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आता त्याला वादग्रस्त ट्विटमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कमाल खानने 2020 मध्ये ट्विट करून अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. ट्विटमध्ये कमाल खानने इरफान खानबद्दल म्हटले होते की, अल्लाह, कोणावरही वाईट वेळ येऊ नये, परंतु इरफान खान हा एक आवडता आणि अतिशय दयाळू व्यक्ती आहे. इरफान आपल्या फिल्ममेकरला कुत्रा म्हणायचा आणि अनेक चित्रपटांचे शूटिंग करून अपूर्ण राहिले. निर्माते रडतच राहतील, हे ट्विट इरफानच्या मृत्यूनंतर कमालने ट्विट केले होते. तसेच कमालने अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दलही ट्विट केले होते. ज्यात कमलने लिहिले होते ऋषी कपूर एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल. सर ठिक होकर जल्दी वापस आना, निकल मत लेना क्यू की २ से ३ दिन मे दारू की दुकान खुलने वाली है.

विराट कोहलीबाबतही अपमानास्पद केले होते ट्विट - आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेल्या अभिनेता कमाल आर खान याने Kamal Rashid controversial tweets आजवर अभिनेता सलमान खान, अभिषेक बच्चनवर Abhishek Bachchan on KRK यांच्यावरही बेताल वक्तव्य केले होते. केआरकेच्या टीकांवर अभिषेकही गप्प बसला नव्हता. अभिषेकने त्याला कमाल आर खानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा सर्व वाद अभिषेक बच्चनच्या ट्विटने सुरू झाला असून, त्यात त्याने एका साऊथ चित्रपटाचे कौतुक केले आहे. विराट कोहली हा अभिनेत्रीसोबत विवाह केल्याने नैराश्यात आल्याचे ट्विट केले होते. मात्र, त्याला ट्रोल करण्यात आल्याने त्याने ट्विट काढून टाकले.

हेही वाचा - महेश भट्टचे खरे नाव अस्लम असल्याची कंगना रणौतची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.