ETV Bharat / entertainment

Actor Aditya Singh Rajput death case : अभिनेता आदित्य सिंग राजपूतचे बाथरुममध्ये प्रेत आढळले, मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क - मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क

अभिनेता आदित्य सिंग राजपूत 22 मे रोजी दुपारी त्याच्या राहत्या घरात बाथरुममध्ये मृतावस्थेत शव आढळले. त्याच्या अकाली निधन झाल्याने बॉलिवूड आणि टीव्ही जगतावर शोककळा पसरली आहे.

Actor Aditya Singh Rajput
अभिनेता आदित्य सिंग राजपूत
author img

By

Published : May 23, 2023, 3:18 PM IST

मुंबई : अभिनेता आदित्य सिंग राजपूत 22 मे रोजी दुपारी त्याच्या राहत्या घरात बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर आदित्यच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. शिवाय आदित्य सिंह राजपूतचे अकाली निधन झाल्याने बॉलिवूड आणि टीव्ही जगतावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 32व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. आदित्य हा मुंबईतील एक प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग कोऑर्डिनेटर होता. आदित्याने बॉलिवूडमध्ये आणि अनेक ब्रँडच्या जाहिरातमध्ये काम केले होते. अंधेरीमध्ये सोमवारी त्याचा 11व्या मजल्यावरील उंच इमारतीच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत शव आढळला.

मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क : तसेच या अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांकडून माहिती मिळाली आहे की, आदित्य मृत्यू हा बाथरूममध्ये घसरून पडल्याने झाला असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तर दुसरीकडे, पोलीसकडून असे सांगण्यात आले की, आदित्यच्या कानाच्या वर कापल्याच्या दोन जखमा आणि डोक्याला मार लागला आहे, ज्यामुळे तो पडण्याची शक्यता आहे. आदित्याची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती, असे पोलिसांनी सांगण्यात आले आहे. मोलकरणीने पोलिसांना सांगितले की अभिनेत्याला खोकला, सर्दी आणि उलट्या होत होत्या, तसेच या रविवारी आदित्यने पार्टी केली होती.

मोलकरणी आपल्या जबानीत काय म्हटले? : मोलकरणीच्या म्हणण्यानुसार, सोमवारी आदित्य हा सकाळी 11 वाजता उठला आणि त्याने नाश्त्यामध्ये पराठा खाल्ला पण त्यानंतर त्याला सतत उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर त्याने स्वयंपाकाला खिचडी बनवायला सांगितली. दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यान आदित्य हा बाथरूममध्ये गेला. त्यांच्या घरातील नोकराला त्याचा जोरात पडल्याचा आवाज आला आणि त्याने धाव घेतली तेव्हा आदित्य जमिनीवर पडला होता आणि त्याला किरकोळ दुखापतही झाली होती.

चौकीदाराने आपल्या जबानीत काय म्हटले? : वॉचमनच्या म्हणण्यानुसार, घरातील लोक मदतनीस खाली धावत आले त्यांनी मला मदत मागितली. त्यानंतर मी तिथे गेलो असता बाथरूममधील काही फरशाही तुटलेल्या होत्या, त्यानंतर बेशुद्ध झालेल्या आदित्यला उचलण्यात आले. त्याला बेडवर झोपवले. सोसायटी बाहेर असलेल्या हॉस्पिटलमधूनही डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्याचवेळी डॉक्टरांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवावे लागेल, असा सल्ला दिला.

आज होणार अंत्यसंस्कार : यानंतर राजपूत यांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले असता त्याला तिथे मृत घोषित करण्यात आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आदित्यचे आज सकाळी 11 वाजता सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनसाठी नेले होते. कुटुंबीयांच्या मान्यतेनुसार आजच त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

करिअरची सुरूवात : आदित्यने वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरची सुरूवात केली. तसेच सुरुवातीला ‘क्रांतिवीर’ आणि ‘मैने गांधी को नहीं मारा’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याने आतापर्यत 300 जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच त्याने स्प्लिट्सविला 9मध्ये भाग घेतला होता. आशिकी, लव्ह, कोड रेड, आवाज सीझन 9, बॅड बॉय सीझन 4 सारख्या इतर टीव्ही कार्यक्रमात त्याने काम केले आहे. नुकताच, तो एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये जोडला गेला होता आणि तो तिथे कास्टिंगचे काम सांभाळत होता. तो मुंबईमध्ये ग्लॅमर दुनियेत असल्यामुळे तो अनेकदा सेलिब्रिटीच्या पार्ट्या आणि पेज 3 इव्हेंटमध्ये नियमितपणे दिसत होता. आदित्यच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय एक मोठी बहिण आहे.

हेही वाचा : Movie Promotion :अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान जयपूरच्या रस्त्यावर फिरताना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.