मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चन ( Abhishek Bachchan ) आणि माजी क्रिकेटपटू कपिल देव ( Kapil Dev ) इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) च्या आगामी सोहळ्यात भारतीय तिरंगा फडकवणार आहेत. अभिषेक बच्चन हा IFFM मध्ये प्रमुख पाहुण्यांपैकी एक म्हणून उपस्थित असेल. या बाबत अभिषेक म्हणाला की हा त्याच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.
"प्रतिष्ठित फेडरेशन स्क्वेअरवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही एक अशी घटना आहे जिथे संपूर्ण ऑस्ट्रेलियातील भारतीय, विविध पार्श्वभूमी असलेले लोक भारताचे 75 वर्ष साजरे करण्यासाठी एकत्र येतील. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मैत्रीची ही एक चांगली खूण आहे. कपिल सरांसोबत हे व्यासपीठ सामायिक करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हा कार्यक्रम सिनेमा आणि क्रिकेटच्या एकत्र येण्याचीही खूण आहे. या दोन गोष्टींनी अनेकदा आम्हा भारतीयांना एकत्र आणलं आहे. भारताचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतीय आणि हा ऐतिहासिक क्षण आणि कार्यक्रम साजरा करण्यासाठी उपस्थित असलेल्या शेकडो लोकांमध्ये आपल्या देशाची स्फुर्ती असणार आहे,” असे अभिषेक म्हणाला.
महोत्सवाची संचालिका मीतू भौमिक लांगे पुढे म्हणाली, "भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. या वर्षी कपिल देव आणि अभिषेक बच्चन संयुक्तपणे एकत्र येऊन भारतीय तिरंगा फडकवणार असल्यामुळे या सन्मान सोहळ्यासाठी आम्ही आनंदी आहोत. आपला देश ऑस्ट्रेलियासोबत असलेल्या मैत्री साजरी करीत आहे आणि या दोन आयकॉन्सनी एकत्र येणे म्हणजे सिनेमा आणि क्रिकेटचे परिपूर्ण मिश्रण आहे."
इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) व्हिक्टोरियन राजधानीत 12-20 ऑगस्ट 2022 दरम्यान प्रत्यक्ष आणि व्हर्चुअली अशा दोन्ही ठिकाणी होणार आहे. जगाला कोरोना साथीच्या आजाराने ग्रासण्यापूर्वी, 2019 मध्ये हा महोत्सव शाहरुख खान, अर्जुन कपूर, तब्बू, विजय सेतुपती, रिमा दास, झोया अख्तर, करण जोहर यांच्यासारख्यांनी आयोजित केला होता. 2020 आणि 2021 मध्ये उत्सव व्हर्चुअली आयोजित करण्यात आला होता.
इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2022 मध्ये 100 हून अधिक समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट प्रदर्शित होतील. अनुराग कश्यप दिग्दर्शित तापसी पन्नूच्या दोबारा या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
हेही वाचा - 'इमर्जन्सी' चित्रपटातील श्रेयस तळपदेचा 'अटल बिहारी वाजपेयी' फर्स्ट लूक