ETV Bharat / entertainment

आमिर खानची आई झीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका - सुपरस्टार आमिर खान

सुपरस्टार आमिर खानची आई झीनत हुसेन यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या त्यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

झीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका
झीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका
author img

By

Published : Oct 31, 2022, 9:23 AM IST

मुंबई - सुपरस्टार आमिर खानची आई झीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या आईवर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमिरच्या जवळच्या सूत्राने ही माहिती दिली की, आमिरची आईला दिवाळीत हृदयविकाराचा झटका आला.

आमिर त्याच्या पाचगणी निवासस्थानी त्याच्या आईसोबत होता तेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. आमिरच्या आईच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये आमिरने आपल्या आईचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला होता. सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये आमिरची आई तिच्या घरी वाढदिवसाचा केक कापताना दिसली होती. आमिरची माजी पत्नी किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद देखील या सेलिब्रेशनचा एक भाग होता.

दरम्यान, व्यावसायिक आघाडीवर, आमिर शेवटचा लाल सिंग चड्ढामध्ये करीना कपूर खानसोबत दिसला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही. रिलीजदरम्यान हा चित्रपट खूप वादात सापडला होता.

हेही वाचा - Pushpa 2 : अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाच्या शूटिंगला झाली सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.