ETV Bharat / entertainment

आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानचा विवाह मोठ्या थाटामाटात पडला पार - नुपूर शिखरे

Ira Khan-Nupur shikhare Wedding: आमिर खानची मुलगी आयरा खाननं आणि फिटनेस कोच नुपूर शिखरेसोबत लग्न केलं आहे. यावेळी आमिर खानसोबत त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव देखील उपस्थित होती.

Ira Khan-Nupur shikhare Wedding
आयरा खान-नुपूर शिखरेचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 11:22 AM IST

मुंबई - Ira Khan Wedding: आमिर खानची लाडकी आयरा खानचं लग्न झालं आहे. तिन 3 जानेवारीला बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्टात लग्न केलं. कोर्ट मॅरेजनंतर नूपूर आणि आयरा बाहेर आल्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोझ दिली. आता आयरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत नूपुरनं ब्लू कलरची शेरवानी परिधान केली आहे. आयराच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं निळ्या ब्लाउजसह गुलाबी रंगाचा सिल्क पायजामा घातला आहे. यावर तिनं ओढणी घेतली आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसतंय. लग्नातील फोटोमध्ये आमिर खान, किरण राव, रीना दत्ता, आझाद आणि जुनैद हे एकत्र दिसत आहे.

आयरा खानचं लग्न : आयराचे फॅमिलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. याशिवाय आयरानं तिच्या दोन्ही भावांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. जुनैदने ग्रे कलरचा सूट परिधान केला आहे, तर आझादनं निळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला आहे. कोर्ट मॅरेजनंतर हे जोडपे आपल्या कुटुंबासह उदयपूरला रवाना होणार आहे. आयराच्या लग्नात आमिर खान हा पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसला. किरण स्टेजवर जाताच आमिर तिला भेटायला आला. तेव्हा दोघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नुपूरनं दिली आयराला साथ : 'कोविड 19' दरम्यान आमिर आणि किरण वेगळे झाले होते. एक व्हिडिओ शेअर करून आमिरनं विभक्त होण्याची पुष्टी केली होती. घटस्फोटानंतर दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. दरम्यान नुपूरबद्दल बोलायचं झालं तर तो फिटनेस कोच असून त्यानं आमिर खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा ट्रेनर राहिला आहे. आमिरनं नुपूरबद्दल बोलाताना एकदा म्हटलं होत की, 'जेव्हा आयरा डिप्रेशनशी झुंज देत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. त्यावेळी त्यानं तिला भावनिक आधार दिला आहे. तिनं असा माणूस निवडला मला याबद्दल आनंद आहे. ते एकत्र खूप आनंदी आहेत. त्यांच्यात चांगल जमते.'' आमिर खानच्या मुलीचं लग्न सध्या खूप चर्चेत आहे. आयरा आणि नुपूरचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आहे.

हेही वाचा :

  1. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरी; सहा लाखाचे दागिने गेले चोरीला, आरोपीला अटक
  2. आमिरच्या जावयाची लग्नासाठी हटके एंट्री, आला जिम ट्रेनरच्या वेशात! व्हिडिओ व्हायरल
  3. नवीन वर्षात कतरिना कैफची कळी चांगलीच खुलली, विकी कौशलसोबतचे व्हेकेशनचे शेअर केले भन्नाट फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.