मुंबई - "१७०१ पन्हाळा" या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पुण्याजवळ तळेगाव येथे सुरु आहे. आपला चित्रपट जास्तीतजास्त वास्तवदर्शी असावा जेणेकरून चित्रपट बघताना प्रेक्षकांना आपण तो काळ प्रत्यक्ष अनुभवत आहोत असे वाटले पाहिजे ही भावना ठेऊन निर्माते स्वप्नील गोगावले प्रचंड मेहनत घेऊन "१७०१ पन्हाळा"ची निर्मिती करीत आहेत. त्यासाठी मराठी ऐतिहासिक सिनेमातील आतापर्यंतचा सर्वात भव्य दिव्य असा सेट उभारण्यात आलेला आहे, या सेट मागे या सिनेमाची संपूर्ण संपूर्ण टीमची पण खूप मेहनत आहे.
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/a2_2510newsroom_1666682340_595.jpeg)
अवकाळी पावसाने सध्या धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे सेटचे कुठलेही नुकसान होऊ नये आणि चित्रीकरण अखंडित सुरु राहिले पाहिजे यासाठी इंडस्ट्रिअल एरियामध्ये तब्बल २० हजार स्क्वेअर फूटापेक्षा जास्त आकाराच्या बंदिस्त शेडमध्ये हा सेट उभा केला आहे. या भव्य सेटमध्ये विविध दालने, दरबार आणि क्रोमा सेटअप उभा केला आहे, त्याबरोबरच प्रकाश योजना सुद्धा अगदी कालानुरूप वाटावी अशी केली आहे. निर्माते स्वप्नील गोगावले खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहिल्यामुळे या चित्रपटाची निर्मिती मोठ्या स्वरूपात करणे शक्य झाल्याचे मत लेखक, दिग्दर्शक मिथलेश यांनी व्यक्त केले, या प्रसंगी चित्रपटाच्या सहनिर्मात्या सोमा माणिक दास उपस्थित होत्या.
![ऐतिहासिक चित्रपट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/a1_2510newsroom_1666682340_884.jpeg)
या भव्य चित्रपटात महेश मांजरेकर यांच्यासोबत संजय खापरे, सुशांत शेलार, दिपाली सय्यद, हरीश दुधाडे, माधवी निमकर, तृप्ती तोरडमल, वैभव चव्हाण आणि रमेश परदेशी हे नामवंत कलाकार सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत, तर संगीतकार अमित राज यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. "१७०१ पन्हाळा" चे चित्रिकरण डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणार असून चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने चिरंजीवी, प्रणिता रोमांचित