मुंबई - National Film Awards 69th ceremony: दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडत आहे. 24 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. दरम्यान आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडपासून ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार सहभागी झाले आहेत.
-
#WATCH | Allu Arjun receives the Best Actor Award for 'Pushpa: The Rise', at the National Film Awards. pic.twitter.com/FemqdiV41y
— ANI (@ANI) October 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Allu Arjun receives the Best Actor Award for 'Pushpa: The Rise', at the National Film Awards. pic.twitter.com/FemqdiV41y
— ANI (@ANI) October 17, 2023#WATCH | Allu Arjun receives the Best Actor Award for 'Pushpa: The Rise', at the National Film Awards. pic.twitter.com/FemqdiV41y
— ANI (@ANI) October 17, 2023
आलिया भट्ट, अल्लू अर्जुन आणि क्रिती सेनॉननं स्वीकारला पुरस्कार : साऊथ चित्रपटाचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला आहे, तर आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी अल्लू अर्जुन, साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक एमएम कीरावाणी यांचाही या सोहळ्यात सन्मान होत आहे. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दुपारी 1:30 वाजता सुरू झाला असून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण डीडी नॅशनलवर करण्यात आले आहे.
-
#WATCH | Alia Bhatt receives the Best Actress Award for 'Gangubai Kathiawadi', at the National Film Awards. pic.twitter.com/dwiXrBGlND
— ANI (@ANI) October 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Alia Bhatt receives the Best Actress Award for 'Gangubai Kathiawadi', at the National Film Awards. pic.twitter.com/dwiXrBGlND
— ANI (@ANI) October 17, 2023#WATCH | Alia Bhatt receives the Best Actress Award for 'Gangubai Kathiawadi', at the National Film Awards. pic.twitter.com/dwiXrBGlND
— ANI (@ANI) October 17, 2023
चित्रपटांचा असेल बोलबाला : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या वर्षी विविध चित्रपटांचा बोलबाला असणार आहे. आर माधवनच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' या चित्रपटानं यावर्षी 'सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटा'चा पुरस्कार पटकावला आहे तर अल्लू अर्जुन हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. 'पुष्पा : द राइज' या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी, 'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट्ट आणि 'मिमी'साठी क्रिती सेनॉन यांना विभागून पुरस्कार देण्यात आला आहे. ऑस्कर विजेता संगीतकार एमएम कीरवानी यांना 'आरआरआर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येतंय.
-
Queen pic.twitter.com/Oz1XsIVRAY
— h. (@losttt_boi) October 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Queen pic.twitter.com/Oz1XsIVRAY
— h. (@losttt_boi) October 17, 2023Queen pic.twitter.com/Oz1XsIVRAY
— h. (@losttt_boi) October 17, 2023
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - रॉकेट्री द नंबी इफेक्ट (आर माधवन)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- सरदार उधम (विकी कौशल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी) आणि क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जुन (पुष्पा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट संपादक- संजय लीला भन्साळी (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - देवी श्री प्रसाद (पुष्पा)
सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शन- आरआरआर
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- आरआरआर
सर्वोत्तम स्पेशल इफेक्ट्स - आरआरआर
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- छेलो शो
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपट - बूमबा राइड
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- अनुआर
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट - कालोखो
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- ७७७ चार्ली
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट - समंतर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- एकडा के जाऊ
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- होम
सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म - एक था गाव (गढवाली आणि हिंदी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- बकुल मतियानी (स्माइल प्लीज)
कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - चांद सनसेन (हिंदी)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - बिट्टू रावत (पाताळ चहा)
सर्वोत्कृष्ट अन्वेषणात्मक चित्रपट – लुकिंग फॉर चालन (इंग्रजी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट- सिरपिगालिन सिपांगल (तमिळ)
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- मिठू दी (इंग्रजी), एक दोन तीन (मराठी, हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट – मुन्नम (मल्याळम)
नर्गिस दत्त पुरस्कार 2023- द काश्मीर फाइल्स (विवेक अग्निहोत्री)
हेही वाचा :
Tiger 3: 'टायगर 3'मधील इमरान हाश्मीचा फर्स्ट लूक आला समोर; पहा पोस्टर...
Disha patani : दिशा पटानीचा मुंबई विमानतळावरील बोल्ड लूकचा व्हिडिओ झाला व्हायरल ; पहा व्हिडिओ...