ETV Bharat / entertainment

54th IFFI: मायकेल डग्लस ठरणार 'इफ्फी'चं मुख्य आकर्षण, आंतरराष्ट्रीय फिल्म्ससाठी गोवा सज्ज

54th IFFI: यंदाचा 54 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पार पडणार आहे. यामध्ये हॉलीवूड अभिनेता मायकेल डग्लस यांना सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्कारानं गौरवण्यात येईल. या महोत्सवात असंख्य आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रिमीयर होणार आहेत.

54th IFFI
मायकेल डग्लस ठरणार 'इफ्फी'चं मुख्य आकर्षण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 12:30 PM IST

मुंबई - 54th IFFI: यंदाचा 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पार पडत आहे. देशभरातील चित्रपट प्रेमींसाठी हा महोत्सव एक पर्वणी असतो. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात काम करणारे निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्यात आणि प्रेक्षकांच्यात तेट संवाद व्हावा या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.

  • Immerse yourself in the mesmerizing allure of 'Farrey' as they grace the red carpet at #IFFI54 in Goa! Be there on Nov 21st to share in the thrill and catch a glimpse of this extraordinary team. Don't miss out on this cinematic celebration!
    Register now at https://t.co/JZISyPm1zS pic.twitter.com/UBcpQNjcS3

    — International Film Festival of India (@IFFIGoa) November 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

2023 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये नवीन अनेक श्रेणीतील चित्रपट रिलीज केले जातील. या महोत्सवात हॉलीवूड अभिनेता मायकेल डग्लस यांना सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

  • Join us on Wednesday, 22 November at 12:30 PM for a captivating session – “Living the Character” with the versatile actor Vijay Sethupathy in conversation with the renowned Kushboo Sundar only at the #iffi54 pic.twitter.com/NNrRUtDUxP

    — International Film Festival of India (@IFFIGoa) November 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या महोत्सवात 'गाला प्रीमियर्स'मध्ये चित्रपट आणि मालिका दाखवण्यात येतील. सिने तारे तारका आणि लोक यांच्यातील संबंध वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री हिची भूमिका असलेला फर्रे या चित्रपटाचं स्क्रिनिंग गोव्यातील या महोत्सवात होणार आहे. या शिवाय फेस्टिव्हलमध्ये पंकज त्रिपाठीच्या कडक सिंग आणि गांधी टॉक्सचा वर्ल्ड प्रीमियर देखील होईल ज्यात एआर रहमानचा साउंडट्रॅक आहे आणि त्यात विजय सेतुपती, अरविंद स्वामी आणि अदिती राव हैदरी हे कलाकार आहेत.

किशोर पाडुरंग बेलेकर यांच्या 'गांधी टॉक्स'मध्ये हिंदू पौराणिक कथा आणि समुद्र मंथन या कथेच्या वेधक संदर्भांसह भांडवलशाही, वर्णद्वेष आणि समाजाचं खोलवर घेतलेल्या शोधावर सामाजिक भाष्य यात पाहायला मिळेल. या महोत्सवात अनेक चित्रपटांचं स्क्रिनिंग पाहायला मिळणार आहे, यामध्ये सौमेंद्र पाधी यांनी दिग्दर्शन केलेला व सलमान खान प्रॉडक्शनने बनवलेला 'फर्रे' या चित्रपटातून एक रोमांचक प्रवास घडणार आहे. अनिरुद्ध रॉय चौधरी यांचा चित्रपट 'कडक सिंग' हा चित्रपट प्रतिगामी स्मृतिभ्रंश झालेल्या इन्स्पेक्टर ए.के. श्रीवास्तव या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. आजारी असूनही, तो चिटफंड घोटाळ्याचे गुंतागुंतीचे गूढ उलगडण्यात त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टी ऐकून आणि तो हॉस्पिटलमध्ये कसा आला याची रंजक कथा यात पाहायला मिळणार आहे. मिलिंद राऊचा 'द व्हिलेज' हा चित्रपट प्रेक्षकांना एका गूढ आणि थरारक कथानकात गुंतवणारा आहे.

  • We are thrilled to present our official selection of 15 International and Indian fiction feature films which will compete for the Golden Peacock Award for Best Film!
    Join us in celebrating the joy cinema. Watch this space for updates, and mark your calendars! #IFFI54 pic.twitter.com/6BCWOpYmZa

    — International Film Festival of India (@IFFIGoa) November 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डिअर जस्सी, हर्री ओम हर्री, रौतू की बेली, धूथा, दिल है ग्रे आणि ग्रे गेम्स सारख्या इतर उत्कृष्ट चित्रपटांसह 54 व्या IFFI च्या गाला प्रीमियर्स विभागात विविध आणि मनोरंजक सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फी फिल्म फेस्टीव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे. हा महोत्सव अनुभवी आणि नवीन चित्रपट निर्मात्यांना त्यांचे उत्कृष्ट कार्य जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठीचा एक मंच प्रदान करतो.

  • Witness the magic of 'Ae Watan Mere Watan' as they grace the red carpet at Watan’s International Film Festival in Goa! Join them on Nov 21st and catch a glimpse of @KaranJohar and his incredible team. It's a cinematic celebration you won't want to miss! #IFFI54@PrimeVideoIN pic.twitter.com/uwbkcELUTZ

    — International Film Festival of India (@IFFIGoa) November 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) अखेरच्या दिवशी हॉलिवूड अभिनेता मायकेल डग्लस यांना सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्कार प्रदान केला जाईल. मायकेल डग्लस हे त्यानंतर दक्षिण भारतातील चित्रपट निर्मात्यांना आणि कलाकारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हैदराबादला जाणार असल्याची चर्चा आहे. साऊथ स्टैार विजय सेतुपतीसह अनेक दिग्गज कलाकारांशी डग्लस यांची भेट होणार आहे.

हेही वाचा -

1. AR Rahman faces backlash : एआर रहमानचं गाणं वादाच्या भोवऱ्यात, 'पिप्पा'च्या निर्मात्यांनी मागितली माफी

2. Ranveer Singh : रणवीर सिंगनं मुंबईत खरेदी केले दोन लग्जरियस फ्लॅट्स, अधिक जाणून घेण्यासाठी वाचा

3. Sam Bahadur sonng release : 'सॅम बहादूर'मधील 'बढते चलो' या देशभक्तीपर गाण्याचं विकी कौशलनं केलं लॉन्चिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.