हैदराबाद - बॉलीवूड अॅक्ट्रेस करीना कपूर खान अलीकडेच पती सैफ अली खानसोबत सुट्ट्यांमध्ये लंडनला ( London holiday ) गेली होती. तिथून, पटौदी परिवाराचे ( Pataudi family ) अनेक फोटो चाहत्यांसमोर आले होते. ज्यामुळे करीना पून्हा गर्भवती असल्याचा चर्चा ( Kareenas pregnancy remorse ) सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली. त्यावर आता खुद्द करिनानेच या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.
चर्चांना खोडून काढले - करीना कपूरने आई होणाच्या चर्चांना गमतीशीर अंदाजात खोडून काढले आहे. त्याशिवाय चाहत्यांना टेंशनफ्री राहण्यास सांगितले आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण दिले आहे की ती गर्भवती नाही. "हा पास्ता आणि वाइन आहे मित्रांनो, मी गर्भवती नाही ( I am not pregnant ), सैफ म्हणतो की त्याने आधीच आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये पूर्ण योगदान दिले आहे. असे करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ( Kareena Kapoor Instagram Story ) शेअर केले आहे.
लंडनमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद - मात्र बॉलीवूड अॅक्ट्रेस करिना कपूर खानचे ( Bollywood actress Kareena Kapoor Khan ) अनेक चाहते आहेत. जे अभिनेत्रीच्या या अप्रतिम उत्तरावर खूश झाले आहेत. नुकतेच पटौदी कुटुंब लंडनमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊन आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सारा अली खान आणि इब्राहिम अली खान त्यांच्यासोबत होते. सारा अली खान तिच्या कामासाठी तिथे गेली होती, ते सर्व आता भारतात परतले आहेत.
लाल सिंग चड्डा - करीना कपूरच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, करीना पुन्हा एकदा तिचा सहकलाकार आमिर खानसोबत दिसणार आहे. आमिर आणि करिनाचा लाल सिंग चड्डा ( Lal Singh Chaddha ) हा चित्रपट पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे. याआधी ही जोडी ब्लॉकबस्टर चित्रपट 3 इडियट्समध्ये दिसली होती.
हेही वाचा - मानुषी छिल्लरने जॉन अब्राहमसोबत सुरू केले 'तेहरान'चे शूटिंग