ETV Bharat / elections

अनंत गीतेंनी संसदेत तोंड उघडले, मात्र केवळ जांभई देण्यासाठी : शरद पवारांचा उपरोधिक टोला

अलिबागमधील सभेच्या निमित्ताने काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर व जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर प्रथमच दिसले.

अलिबागमधील प्रचारसभेत बोलताना शरद पवार
author img

By

Published : Apr 19, 2019, 1:24 PM IST

रायगड - अनंत गीतेंनी संसदेत तोंड उघडले नाही, असे म्‍हणणे चुकीचे आहे. त्‍यांनी तोंड उघडलेले मी पाहिले आहे, पण ते जांभई देण्‍यासाठी! असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनंत गीतेंना लगावला. ते अलिबाग येथील लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरेंच्या प्रचारसभेत बोलत होते.

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्‍ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्‍या प्रचारासाठी अलिबाग येथे सभा घेण्यात आली. यावेळी शरद पवारांनी अनंत गीतेंसह मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

अलिबागमधील प्रचारसभेत बोलताना शरद पवार

जिल्ह्यातील मतदारांनी अनेक वर्षे अनंत गीतेंना संधी दिली. मात्र त्यांनी आपल्‍या मतदारसंघ किंवा समाजासाठी कोणतेही काम केले नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. त्यांच्याकडे लोकांनी अपेक्षेने पाहिले. मात्र त्यांनी मतदारसंघासाठी काहीच पावले टाकली नाहीत. मोदी सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, की सरकारने साखर कारखानदारीकडे दुर्लक्ष केले. या सरकारच्‍या काळात कारखाने बंद पडले आहेत. बेकारीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कायदा आणि सुव्‍यवस्‍था ढासळत चालली आहे. तरुणांच्‍या हाताला काम नाही. त्‍यातून त्‍यांच्‍यात नैराश्‍याची भावना वाढत चालल्‍याचे पवार यावेळी म्‍हणाले.
या प्रचारसभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रथमच एकत्रित गर्दी केल्याचे दिसून आले. तर काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर व जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर प्रथमच दिसले.

Intro:गीतेंनी मतदारसंघातील नागरीकांसाठी काहीच केलं नाही

या सरकारच्‍या काळात बेरोजगारी आणि गुन्‍हेगारी वाढली शरद पवारांचे टीकास्‍त्र  

रायगड : जिल्ह्यातील मतदारांनी अनेक वर्षे संधी देवूनही अनंत गीते यांनी आपल्‍या मतदार संघाच्या किंवा समाजाच्‍या बाबतीत कोणतेही काम केलं नाही अशी टीका राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी केली. गीतेंनी संसदेत तोंड उघडलं नाही असं म्‍हणणं चुकीचं आहे. त्‍यांनी तोंड उघडलेलं मी पाहीलंय पण ते जांभई देण्‍यासाठी, असा उपरोधिक टोलाही त्‍यांनी लगावला. Body:रायगड लोकसभा मतदार संघातील राष्‍ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्‍या प्रचारासाठी अलिबाग येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारवरही टीका केली. या सरकारच्‍या काळात कारखाने बंद पडले आणि त्‍यामुळे बेकारी वाढली. परीणामी कायदा आणि सुव्‍यवस्‍था ढासळत चालली आहे. तरूणांच्‍या हाताला काम नाही त्‍यातून त्‍यांच्‍यात नैराश्‍याची भावना वाढत चालली असल्‍याचं पवार म्‍हणाले.Conclusion:या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्र गर्दी प्रथमच पहावयास मिळाली. तर काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर व जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर प्रथमच दिसले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.