ETV Bharat / elections

Loksabha २०१९: मतदानासाठी 'असे' सजले पनवेल येथील 'सखी मतदान केंद्र'

सखी मतदान केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आतमधील परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. आकर्षक स्वागत कमान, रंगीबेरंगी फुगे आणि फुलांचे स्वागत मार्ग, देखावे, उन्हापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी सुंदर मंडपही उभारण्यात आला आहे.

मतदानासाठी 'असे' सजले पनवेल येथील 'सखी मतदान केंद्र'
author img

By

Published : Apr 29, 2019, 7:51 PM IST

Updated : Apr 29, 2019, 9:46 PM IST

पनवेल - आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. याचे कारण म्हणजे, पनवेल येथील व्ही.के. शाळेतील 'सखी मतदान केंद्र'. या मतदान केंद्रातील सोयीसुविधा पाहुन खरोखर असे मतदान केंद्र असू शकते का? असा प्रश्न मतदारांना पडत आहे.

मतदानासाठी 'असे' सजले पनवेल येथील 'सखी मतदान केंद्र'

सखी मतदान केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आतमधील परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. आकर्षक स्वागत कमान, रंगीबेरंगी फुगे आणि फुलांचे स्वागत मार्ग, देखावे, उन्हापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी सुंदर मंडपही उभारण्यात आला आहे. मतदारांना रांगेत तात्काळत उभे राहण्याचे काम पडू नये म्हणून मंडपात खूर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांसाठी सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला आहे. जेणेकरून मतदान झाल्यानंतर मतदारांना येथे सेल्फी काढता येईल.

मतदान केंद्रातीलया प्रसन्न वातावरणामुळे मतदार भारावून गेले होते. सखी मतदान केंद्रावरील या सोयीसुविधांचे मतदारांनी भरभरुन कौतुक केले. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी अशाप्रकारचे आयोजन केल्यामुळे आनंद होत असल्याचेही महिलांनी व्यक्त केले. सखी मतदान केंद्राच्या उपक्रमासाठी प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी मार्गदर्शन केले.

Intro:बातमीला व्हिडिओ आणि बाईट सोबत जोडले आहेत.

पनवेल

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानासाठी निर्माण करण्यात आलेल्या अनेक मतदान केंद्रापैकी पनवेलमधल्या व्ही.के. शाळेतील मतदान केंद्रात असलेल्या सोयीसुविधा आणि आकर्षक सजावट पाहून खरोखरच असं मतदान केंद्र असू शकतं का ? याचा आनंद घेत सखी मतदार केंद्रावरील आल्हाददायक वातावरणाने पनवेलकर भरावल्याचे दिसून येत आहेत. Body:
या सखी मतदान केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आतमध्ये आकर्षक काढलेली रांगोळी, आकर्षक स्वागत कमान, संपूर्ण केंद्रापर्यंत रंगीबेरंगी फुगे, आणि फुलांचे स्वागत मार्ग आणि देखावे, केंद्रात प्रवेश केल्यानंतर ऊन लागू नये म्हणून सुंदर मंडप देखील उभारण्यात आलाय. मतदार रांगेत उभे राहू नये म्हणून यासाठी सुंदर रंगसंगतीच्या खुर्च्या, सेल्फी काढण्यासाठी तयार करण्यात आलेले
सेल्फी पॉईंट...एखाद्या इव्हेंटच्या प्रसंगी शोभेल असे वातावरण आज पनवेलच्या व्ही. के. स्कूल या मतदान केंद्रावर होते. 'सखी मतदान केंद्र' साकारताना प्रशासनाने केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे मतदार अक्षरश: भारावून गेले होते.Conclusion:
आपल्या कुटुंबीयांसह मतदानासाठी आलेल्या महिला मतदारांनी मतदान केल्यानंतर कुटुंबासमवेत सेल्फीदेखील काढले व लोकशाहीचा उत्सव स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामुळे आपण मतदान करायला आलो की एखाद्या इव्हेंटसाठी आलो आहे, अशा प्रतिक्रिया महिला मतदारांनी दिल्या. सखी मतदान केंद्राच्या उपक्रमासाठी प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी मार्गदर्शन केले.

बाईट- दत्तात्रय नवले, प्रांत अधिकारी, पनवेल

Last Updated : Apr 29, 2019, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.