मुंबई - दक्षिण मुंबई मतदारसंघातून अखंड हिंद पक्ष नावाच्या राजकीय पक्षाने उमेदवारी दाखल केली आहे. उत्तम जैन हे या पक्षाकडून निवडणूक लढतील. जैन यांच्यासारखे अनेक हौशी उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.
उत्तम जैन हे व्यवसायिक आहेत. गुजराती, राजस्थानी समाजासाठी ते काम करतात असा त्यांचा दावा आहे. जैन यांना राजकारणाची आवड आहे. त्यामुळे आपण निवडणूक लढत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज भरताना ढोल ताशाच्या गजरात त्यांनी रॅली काढली. जैन यांच्या पक्षाचे १०० देखील समर्थक मतदारसंघात आढळून येतील की नाही याची शंका आहे. पण, तरी असे अनेक हौशी उमेदवार निवडणूक लढण्यास उत्सुक असतात. मतदार या उमेदवारांना कौल देतात का हे येणाऱ्या काळात दिसेलच.