ETV Bharat / crime

Thunivu Style Bank Robbery : थुनीवू हा चित्रपट पाहून तरुणाने बँकेत टाकला दरोडा, कर्मचाऱ्यांनी आवळल्या मुसक्या - थुनिवू हा चित्रपट पाहुन बँकेत दरोडा

थुनीवू हा दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध चित्रपट पाहून तरुणाने दिंडीगुल येथील इंडीयन ओव्हरसीज बँकेत दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी त्याला बँकेतील कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. खलील रहमान असे त्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

Thunivu Style Bank Robbery
पोलिसांनी अटक केलेला आरोपी खलील रहमान
author img

By

Published : Jan 25, 2023, 5:43 PM IST

दिंडीगुल - तरुणाने थुनिवू हा चित्रपट पाहुन बँकेत दरोडा टाकल्याने खळबळ उडाली. ही घटना दिंडीगुल येथील थाडीकोंबू रोडवरील इंडीयन ओव्हससीज बँकेत मंगळवारी घडली. मात्र येथील धाडसी बँक कर्मचाऱ्यांनी या दरोडेखोर तरुणाच्या मुसक्या आवळल्याने पुढील अनर्थ टळला. खलील रहमान असे त्या बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

काय आहे बँकेत दरोडा टाकण्याचे प्रकरण : खलील हा तरुण बेरोजगार आहे. काम न मिळाल्यामुळे तो निराशेच्या गर्तेत गेला आहे. त्यामुळे त्याने अजित कुमार यांची मुख्य भुमिका असलेला थुनीवू हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटात बँक लुटण्याचा एक प्रसंग चित्रित करण्यात आलेला आहे. त्यामुळे अगोदरच निराशेत असलेल्या खलीलने बँकेत दरोडा टाकण्याची योजना तयार केली. या चित्रपटात एकट्यानेच दरोडा टाकल्याने खलीलनेही एकट्यानेच हा दरोडा टाकण्याचे निश्चित केले.

मिरची पावडर, चाकू आणि कटींग ब्लेडसह पोहोचला बँकेत : दिंडीगुल येथील थाडीकोंबू रोडवर इंडीयन ओव्हससीज बँक आहे. या बँकेत खलील मिरची पावडर, कटींग ब्लेड आणि चाकूसह मंगळवारी सकाळी पोहोचला. यावेळी त्याने बँकेत पोहोचताच त्याने तीन बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यावर मिरची पूड फेकली. त्यानंतर त्याने त्या कर्मचाऱ्यांचे हात प्लॅस्टीकने बांधले. यावेळी इतर कर्मचारी बँकेतून बाहेर पळत दरोडा पडल्याचे आरडोओरडा करत होता. त्यामुळे बँकेतील सुरक्षा रक्षकाने धाव घेतली. त्यासह इतर काही कर्मचारीही धावत आले. यावेळी बँकेत असलेल्या काही ग्राहकांनीही खलीलवर हल्ला करत त्याला पकडण्यास मदत केली. त्यामुळे खलीलच्या बँकेतच मुसक्या आवळण्यात आल्या. त्याला जमावाने पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी केले खलीलला अटक : बँकेतील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी खलीलला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी खलीलला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी पोलिसांनी आरोपी खलील हा काम नसल्याने निराश झाला होता. त्यातच त्याने अजित कुमार यांची भुमीका असलेला थुनीवू हा चित्रपाट पाहून बँक लुटण्याची योजना आखल्याची माहिती दिली. आरोपी खलीलला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने कोठडी सुनावल्याची माहितीही यावेळी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - Vande Bharat Express : आता वंदे भारत एक्स्प्रेसमुळे पाहता येईल दक्षिण भारतातील धार्मिक स्थळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.