अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ( Amravati District Central Jail ) मंगळवारी पहाटे तीन कैदी फरार ( Three Prisoners Escaped ) झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अतिशय कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फ्रेजरपुरा पोलीस ( Frazerpura Police ) कारागृहात पोहोचले असून, या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावरून केली जात आहे. प्रार्थना सभागृहात बंदिस्त कैदी होते. साहिल अजमल कासकेकर राहणार रत्नागिरी, रोशन गंगाराम उईके राहणार धारणी आणि सुमित धुर्वे राहणार धारणी, असे कारागृहातून पळालेल्या कैद्यांची नावे आहेत.
कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील प्रार्थना सभागृहाला कोठडीत परिवर्तीत करून त्यामध्ये काही कैद्यांना ठेवण्यात आले होते. यात असणारे हे तिघेही आरोपी लोखंडी फाटकाची गज वाकवून बाहेर निघाले आणि त्यांनी ब्लॅंकेट आणि चादरीच्या साह्याने कारागृहाची भिंत चढून कारागृहातून पळ काढला. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 938 कैद्यांना ठेवण्याची क्षमता असून, सध्या स्थित कारागृहात सुमारे पंधराशे कैदी आहेत. त्यातुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis: रखडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करण्याचे दत्तात्रय भरणेंना निवेदन