मुबंई घाटकोपर येथील रमाबाई नगर तरुण मित्र मंडळ या परिसरात राहात असलेल्या विशाल कारंडे या तरूणाची हत्या करण्यात आली आहे. विशाल २० वर्षांचा होता. जुन्या भांडणाच्या रागातून त्याची 7 जणांनी मिळून हत्या केल्याचे बोलले जात आहे.
काल 1 मे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणांनी विशालला घरातून बाहेर बोलावून घेतले. तरुण मित्र मंडळाच्या चौकात नेऊन त्याला मारहाण केली. लाथा बुक्क्यांनी पेव्हर ब्लॉक लादीने व धारदार शास्त्राने पाठीवर वार केले. यात विशालचा मृत्यू झाला. विशालसोबतच्या जुन्या भांडणाच्या रागातून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे आता रमाबाई नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आता हल्ला करणाऱ्या 7 आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, विशाल कारंडेच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे दिसले.