ठाणे - एका 9 वर्षीय अल्पवयीन पीडितेला शीतपेय मधून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकार कुणाला सांगितल्यास पीडित मुलीला ठार मारण्याची देखील धमकी ( Threat ) दिली होती. हि धक्कादायक घटना भिवंडी शहर पोलीस ( Bhiwandi City Police ) ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यावेळी नराधमावर अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून, भिवंडी शहर पोलिसांनी बेड्या ठोकले होते. आता सुमारे 7 वर्षांनी या नराधमाला अंतिम सुनावणी वेळी ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश (पोक्सो) व्ही. व्ही. वीरकर यांनी 6 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गणेश ऊर्फ गण्या सदावर्ते ( वय- 23 ) असे शिक्षा सुनावलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे.
पीडितेच्या पोटात दुखू लागल्यावर घटना उघडकीस आली - पीडित मुलगी भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहते. ती 31 मे 2015 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना, त्यावेळी नराधमाने तिला अंधाराचा फायदा घेऊन घरासमोरूनच तिचे तोंड दाबून जवळच उभ्या असलेल्या गाडीच्या मागे नेले. त्यानंतर त्याने तिला दारूसारखे नशा येणारे, शीतपेय पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. अत्याचार केल्याची माहिती जर आई- वडिलांना दिली, तर तुला मी ठार मारून टाकेन अशी धमकीही नराधमाने दिली होती. काही दिवसांनी पीडितेच्या पोटात दुखू लागल्यावर तिच्या आईने तिची वैद्यकीय तपासणी केली. याच तपासणीमध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात ( Police stations ) याप्रकरणी आरोपीविरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक करण्यात आली होती.
पुरावे आणि 9 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून शिक्षा - पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याच खटल्याची विशेष ( पोस्को ) न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांच्यासमोर गुरुवारी अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये पीडितेच्या बाजूने सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी प्रखर बाजू मांडत न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे आणि 9 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी गण्या उर्फ गणेश याला न्यायालयाने दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमान्वये 6 वर्षे सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास ५० दिवस साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. अशी माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा