लखनौ - धर्मांतर न केल्याने हिंदू मुलीची हत्या करणारा सुफियान पोलीस चकमकीत जखमी झाला आहे. (man killed hindu girl injured in police encounter). चकमकीनंतर पोलिसांनी सुफियानला अटक केली. जखमी झालेल्या सुफियानला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. (police encounter in lucknow).
छतावरून खाली फेकल्याचा आरोप - पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह दुबग्गा पोलीस स्टेशन परिसरात राहत होती. कॉलनीत सुफियान नावाचा तरुण राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफियानने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीला नवीन मोबाइल दिला होता. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार करण्यासाठी सुफियानचे घर गाठले. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला. दरम्यान, मुलगी गच्चीवर गेली आणि सुफियानही तिच्या मागे गेला. सुफियानने तिला छतावरून खाली फेकून दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे, त्यानंतर तो फरार झाला आहे.
अटकेसाठी बक्षीस जाहीर केले होते - सुफियानच्या अटकेसाठी लखनौच्या पोलीस आयुक्तालयाने शुक्रवारी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. शुक्रवारी अधिवक्ता रंजना अग्निहोत्री यांना भेटण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांनी कुटुंबाच्या वतीने खटला लढण्याचे आश्वासनही दिले होते. आरोपी सुफियानला पकडण्यासाठी लखनौ क्राइम ब्रँचसह 5 टीम शोधात गुंतल्या होत्या.