ETV Bharat / crime

Surat Crime : हत्या करून खांद्यावर मृतदेह नेला दवाखान्यात ; पाहा सीसीटीव्ही फुटेज - सुरतमध्ये हत्या

काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये झालेल्या बस क्लिनरच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हल्ल्यानंतर मृतदेह खांद्यावर घेऊन जाणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे.

Surat Crime
सुरतमध्ये हत्या
author img

By

Published : Jan 18, 2023, 11:06 AM IST

मृतदेह खांद्यावर घेऊन जाणारा आरोपीचे सीसीटीव्ही

सुरत (गुजरात) : 15 जानेवारी रोजी सुरतच्या सरठाणा भागात एका बस क्लिनरची हत्या करण्यात आली होती. आता याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये मारेकरी मृतदेह खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता, बसचालक आणि क्लिनरमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाल्याचे आढळून आले. त्यामुळे चालकाने क्लिनरवर जीवघेणा हल्ला केला आणि नंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत होता. त्याच काळातील हे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

दोघेही एकाच शाळेत कामाला : तीन दिवसांपूर्वी सुरतच्या सरठाणा भागातील आशादीप शाळेच्या पार्किंगमध्ये पात्रे यांच्या खोलीत राहणाऱ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये मारेकरी मृतदेह घेऊन पळताना दिसत आहे. आशादीप शाळेच्या पार्किंगमध्ये पात्रे यांच्या खोलीत राहणाऱ्या स्कूल बस चालकाने बस क्लिनरचा खून केला. आशादीप शाळेत सोहिल सुभेदार सिंग हा बसचालक आणि कल्पेशकुमार रमेशचंद्र उपाध्याय हा सफाई कामगार म्हणून काम करत होता.

हेही वाचा : Video मॉर्निंग वॉकला मालकासोबत गेला नाही कुत्रा, मालकाने दुचाकीला बांधून एक किलोमीटर फरपटत नेले, पहा व्हिडीओ

दवाखान्यात दाखल करून फरार : डीसीपी भक्ती ठाकूर यांनी सांगितले की, पोलिस तपासात ड्रायव्हर आणि क्लिनर दोघेही एकाच खोलीत राहत असल्याचे समोर आले आहे. ड्रायव्हर रोज रात्री उशिरा यायचा. पात्रे यांच्या खोलीतील दरवाजा जोरात ठोठावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या भांडणात चिडलेल्या चालकाने लोखंडी हत्याराने वार करून जखमी केले होते. त्यामुळे रक्त वाहू लागले. एवढेच नाही तर सफाई कामगाराला गंभीर दुखापत झाल्याचे जाणवताच त्यांनी त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आणि तो तिथून पळून गेला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी सफाई कामगाराला मृत घोषित केले आहे. मागच्या महिन्यात गुजरातमधील सुरत शहर तिहेरी हत्याकांडाने हादरले होते. या घटनेत कारखानदारासह दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीनासह दोघांना अटक केली होती. कारखानदाराने मजुराला कामावरून काढून टाकल्यावर मजुराने मित्रांना बोलावून मालकासह त्यांच्या आई-वडीलांची हत्या केली होती.

हेही वाचा : Gadarpur Rape Attempt : घरमालाकाचा जवानाच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न, पीडितेने तोडले नराधमाचे नाक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.