ETV Bharat / crime

Fake IB Officer: आयबीत नोकरी लावण्याची अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; तोतया आयबी अधिकारी जेरबंद - Fake IB Officer

सांगली येथे आयबी विभागात (Central Economic Intelligence Bureau) नोकरी लावण्याची आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया आयबी अधिकाऱ्यास सांगली पोलिसांनी ( Sangli Police ) जेरबंद केले ( IB officer was arrested by the Sangli police ) आहे.

Fake IB Officer Arrested
सांगली येथे तोतया आयबी अधिकारी जेरबंद
author img

By

Published : Jul 23, 2022, 10:38 AM IST

सांगली - केंद्रीय इंटेलिजन्स ब्युरो ( गुप्तचर विभाग ) (Central Economic Intelligence Bureau) विभागात नोकरी लावण्याचा आमिषाने लाखो रुपयांची गंडा घालणाऱ्या तोतया आयबी अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड ( Fake IB Officer Arrested ) केले आहे. अभिषेक वैद्य असे तोतया आयबी अधिकारयाचे नाव आहे. तो मिरज तालुक्यातील आरग येथे राहतो. भामट्याने तिघांची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

तोतया आयबी अधिकाऱ्याला अटक - लातूर येथील तिघांना आपण केंद्रीय "इंटेलिजन्स ब्युरो"आयबी अधिकारी (Central Economic Intelligence Bureau) असल्याची बतावणी करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया आयबी अधिकारयाला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. अभिषेक वैद्य, वय ( 27 ), राहणार आरग,तालुका मिरज असे या भामटयाचे नाव आहे. मूळचे लातूर येथील सुरज सुर्यवंशी यांनी फसवणूकीची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ( Local Crime Investigation Branch Sangli ) अभिषेक वैद्य याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या तोतयागिरीचा पर्दाफाश झाला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुबाडले - फिर्यादी सुरज सूर्यवंशी हे पुण्यात टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी चालवतात. त्याची पिंपरी हिंजवडी या ठिकाणी अभिषेक वैद्य याची सुरज सूर्यवंशी ओळख झाली. त्यातून अभिषेक वैद्यने आपण केंद्रीय आय.बी अधिकारी असल्याचे भासवले होते. या ओळखीतून सुरज सूर्यवंशी यांच्या लातूर या गावी अभिषेक वैद्य गेला होता. त्या ठिकाणी अभिषेक याने सुरज सूर्यवंशी व त्याच्या मित्रांना देखील आपण आय.बी चे अधिकारी असल्याचं पटवुन दिले होते. या सगळ्यांना इंजीनियरिंग विभागातल्या लोकांच्यासाठी आय बी मध्ये जागा निघाल्या आहेत. त्या ठिकाणी आपण नोकरी लावू शकतो. अशी आमिष दाखवली आणि या सर्वांना शेअर मार्केट बिटकॉइन मध्ये पैसे गुंतवल्यास फायदा होईल,असे सांगितले. तर आय.बी मध्ये नोकरी लागण्याच्या अमिषामुळे सुरज सूर्यवंशी यांनी फोन पे द्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अभिषेक वैद्य यांच्याकडे साडेतीन लाख रुपये पाठवले. तसेच सुरज सूर्यवंशी यांचे मित्र अमित पटसाळगे यांनी 75 हजार आणि जय डहाळे यांनी देखील आय बी मध्ये नोकरीसाठी दीड लाख रुपये अभिषेक वैद्य यांच्याकडे गुंतवले. मात्र अभिषेक वैद्य हा आय.बी अधिकारी नसल्याचा समोर आल्यानंतर सुरज सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. अभिषेक वैद्य विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करत तोतया आय बी अधिकारी अभिषेक वैद्ययाला बेड्या ठोकले आहेत.

हेही वाचा : Sangli Crime News : सांगली पोलीस मुख्यालयातील चंदन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.