सुरत (गुजरात) : गुजरातच्या सुरत शहरात गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आता शहराच्या अमरोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरोली परिसरात राहणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलाला दिवे बंद केल्याबद्दल फटकारले. त्यानंतर संतापलेल्या मुलाने चक्क वडिलांची हत्या केली. मुलाने वडिलांच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. यात वडिलांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
वडिलांचा जागीच मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार मूळचा ओडिशा येथील सवाई कुटुंबातील मुकबधीर मुलगा घरातील दिवे बंद करत होता. त्यावेळी त्याचे वडील त्याच्यावर चिडले. वडिलांचे असे वागणे पाहून मुलगाही संतापला. त्याने वडिलांवर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. त्याने वडिलांच्या डोक्यावर देखील दगडाने वार केले. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच अमरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली. शहरातील अमरोली परिसरातील हरिदर्शन सोसायटीत राहणारा मृत गणेश सवाई हा एका कारखान्यात कामाला होता. तो त्याच्या 2 मुलांसह राहत असे. तो मूळचा ओरिसाचा रहिवासी होता. आरोपी मुलगा डायमंड फिक्सिंगचे काम करतो. दुसऱ्या मुलाचे नाव शंकर असून तो मानसिकदृष्ट्या वेडा आहे.
आरोपी ताब्यात : दुसरा मुलगा कामावरून घरी आला तेव्हा त्याला त्याचे वडील मृत दिसले. या प्रकरणी एसीपी आर. पी. झाला यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच अमरोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर रात्री दिवे बंद करण्यावरून मयत व त्याचा मुलगा यांच्यात भांडण झाल्याचे समजले. या वादातून मुलाने रागाच्या भरात घरात पडलेल्या दगडाने वडिलांच्या डोक्यात वार केले. त्यानंतर गणेश सवाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मुलींच्या अपहरणात वाढ : महाराष्ट्रात सध्या अपहरणांच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या काही प्रकरणांमध्ये राजस्थान कनेक्शन आढळले आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2021 मध्ये 363 अल्पवयीन मुलींचे आणि एकूण 418 जणींचे लग्नासाठी अपहरण करण्यात आले होते. यात मुंबईच्या दोन तरुणींचा समावेश होता. राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यात मुलींचा जन्मदर कमी असल्याने महाराष्ट्रातील मुलींचे अपहरण केले जात आहे.