मुंबई : मुंबईच्या दहिसर पोलिस स्टेशन हद्दीतील दहिसर चेक नाकाजवळील गुजरात हाय-वे वरून जाणाऱ्या प्रवाशांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळीचा दहिसर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. गुजरात हाय-वेवरील पायल हॉटेलजवळ गुजरात हाय-वेवर जाणाऱ्या प्रवासी केतन सतिया याच्या गाडीला दुचाकीची धडक देऊन सहा आरोपींनी उलट गाडी धडक दिल्याचा आरोप करीत जबर मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेऊन पळून गेले.
पोलिसांकडून आरोपींना अटक : केतन सतिया याने घटनेनंतर दहिसर पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची तक्रार दिली. यानंतर दहिसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व सहा आरोपींना अटक करून त्यांचा ताब्यातून सोन्याची चेन रिकव्हर केली आहे. या आरोपीचे नाव प्रकाश पोळ, राहुल वाघमोडे, किरण सूर्यवंशी, वैभव पोळ, सूरज सूर्यवंशी, गुरुकिरणा खावडिया असे आहे. सध्या सहाही आरोपी दहिसर पोलिस पोलिसांच्या ताब्यात असून, दहिसर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा : Adulteration of Tea Powder - मुंबई पोलिसांकडून चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक