पिंपरी-चिंचवड ( पुणे ) - एका कॉम्प्युटर इंजिनिअरने पोलिसांच्या आपत्कालीन फोन नंबरवर फोन करून माझे शेजारी बॉम्ब बनवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ( Prime Minister Narendra Modi ) मारण्याचा कट करत ( Conspiracy to kill Narendra Modi ) आहेत. तसेच, मुंबईतील शिवाजी पार्क,( Shivaji Park ) रेल्वे स्थानकात बॉम्ब स्फोट ( bomb blast in railway station) घडवणार आहेत अशी, खोटी माहिती पोलिसांना ( giving false information to police ) दिली होती. या प्रकरणी कॉम्प्युटर इंजिनिअरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मनोज अशोक हंसी असे आरोपी व्यक्तीच नाव आहे.
पोलिसांना दिली खोटी माहिती - आरोपी मनोज हा देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कणक रेसिडेन्सी येथे राहण्यास आहे. त्याच्या वरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडून होत असलेला आवाजामुळं त्रस्त झालेल्या मनोज ने त्यांना अद्दल घडवण्याचं ठरवलं होते. म्हणुन त्याने थेट पोलिसांच्या 112 या आपत्कालीन फोन नंबरवर फोन करून माझे शेजारी बॉम्ब बनवत आहेत. ते मुंबईमधील शिवाजी पार्क, रेल्वे स्थानक बॉम्ब ने उडवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचत असल्याचे त्याने पोलिसांना फोनवर सांगितले होते.
आरोपीला ठोकल्या बेड्या - यामुळं पिंपरी-चिंचवडसह मुंबई पोलिसांची यंत्रणा कामाला लागली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ शहानिशा केल्यानंतर तिथं अस काहीच नसल्याचं निष्पन्न झाल. आरोपी मनोजला खोटी माहिती दिल्याबद्दल जाब विचारल्यानंतर त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.