ETV Bharat / crime

ACB Trap on Police Naik  : 1 कोटीची लाच मागणाऱ्या पोलीस नाईकावर गुन्हा दाखल - Case has been Registered

शेतजमिनीचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही किती रुपये देऊ शकता म्हणत एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी निष्पन्न झाल्याने संशयित लाचखोर पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे ( Police Naik John Vasant Tivade ) (रा. कोरोची, ता. हातकणंगले) नेमणूक पोलीस मुख्यालय याच्याविरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात ( Shahupuri police station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवडे हा सध्या पसार असून, त्याचा शोध सुरू असलेची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

ACB
लाच लुचपत विभाग
author img

By

Published : Aug 6, 2022, 3:05 PM IST

कोल्हापूर : शेतजमिनीचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही किती रुपये देऊ शकता म्हणत एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी निष्पन्न झाल्याने संशयित लाचखोर पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे ( Police Naik John Vasant Tivade ) (रा. कोरोची, ता. हातकणंगले) नेमणूक पोलीस मुख्यालय याच्याविरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा ( Shahupuri police station )दाखल करण्यात आला आहे. तिवडे हा सध्या पसार असून, त्याचा शोध सुरू असलेची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

घटनाक्रम साधारण असा : तक्रारदार यांचे देहुगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथील शेतजमिनीचे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा चालू आहे. यावेळी एका अनोळची व्यक्तीने तक्रारदार यांचेशी फोनवरून संपर्क साधून एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे, तुम्ही भेटा असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन अनोळखी व्यक्तीची भेट घेतली.

फिर्यादींनी केली लाच लुचपत विभागात तक्रार : यावेळी तो व्यक्ती पोलीस वर्दीमध्ये त्यांना भेटली. यावेळी त्या पोलिसाने पुणे येथील दाव्याबाबत तुमच्या विरुद्ध पार्टीने आम्हाला एक कोटीची ऑफर दिली आहे. तुम्ही किती देता ते बोला, तसेच केसचा निकाल तुमच्या बाजुने लावून देतो, तुम्ही किती रुपये देवू शकता? समोरच्या पार्टीने एक कोटीची ऑफर दिली आहे असे म्हणत लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

लाच लुचपत विभागाकडून कारवाई : तक्रारदारांच्या तक्रारीनुसार दिनांक २२ मार्च २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक तिवडे यांनी शासकीय पंच साक्षीदारांचे समक्ष कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात हॉटेल सुब्राय येथे तक्रारदार यांचेकडे जमिनीबाबत एमआरटी कौसिंल पुणे येथील दाव्याचे निकाल तेथील प्रशासकीय सदस्य माने साहेब यांना सांगुन त्यांचेबाजूने लावून देण्यासाठी तक्रारदार चव्हाण यांचे विरुद्ध पार्टीने एक कोटी रुपयेची ऑफर दिली असून तक्रारदार यांना त्यांचे घरच्यांशी चर्चा करून विरोधी पार्टीचे ऑफरप्रमाणे करा, असे म्हणून लाचेची मागणी केलेचे निष्पन्न झाले आहे.

त्या पोलिसाविरोधात पोलिसांत तक्रार : तक्रारदारांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जॉन वसंत तिवडे यांचे विरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी तिवडे हा सध्या फरार असून, त्याला शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली आहे.

हेही वाचा : Emitted Polluted Ash : राखमिश्रित पाणी ठरतेय आरोग्याला हानिकारक; परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.