वैजापूर (औरंगाबाद) - औरंगाबाद ( Aurangabad Crime ) वैजापूर पोलिसांनी ( Vaijapur Police ) मोठी कारवाई करत कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 50 जनावरांची ( Animal ) सुटका केली आहे. राज्यात सध्या गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना सुद्धा या जनावरांना कत्तल करण्यासाठी नेण्यात येणार होते. औरंगाबादच्या वैजापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून, जप्त करण्यात आलेल्या जनावरांची व्यवस्था गोशाळेत करण्यात आली आहे. तर याप्रकरणी तिघांच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात ( Police stations ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर पोलिसांना माहिती मिळाली - या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राज्यात गोवंश हत्या बंदी ( Cow slaughter ban ) कायदा लागू असतांना सुद्धा वैजापूरच्या मिल्लत नगरमधील 3 वेगवेगळ्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे डांबून ठेवल्याची माहिती वैजापूर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी पोलिसांना एकूण 50 जनावरे तर 1 वासरू आढळून आला आहे. त्यांनतर पोलिसांनी या सर्व जनावरांची सुटका करत, त्यांची व्यवस्था घायगांव येथील श्री गुरु गणेश मिश्री गोपालन सेवा संघ या गोशाळेत करण्यात आली आहे. तर यातील 50 जनावरांची किंमत प्रत्येकी 13 हजार रुपये असून, वासराची किंमत 6 हजार रुपये आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अंदाजे एकूण 6 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तिघांवर वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल - याप्रकरणी वैजापूर पोलीसा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहील सत्तार शेख, नदीम खान, सत्तार कुरैशी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना देखील गोवंश जातीचे एकूण 50 जनावरे यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना निर्दयपणे 3 वेगवेगळ्या शेडमध्ये डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलिस करत आहेत.
हेही वाचा - Nagpur Crime News : दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू प्रकरण, पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याची शक्यता