ETV Bharat / city

देह व्यापारासाठी खुणावणारे हात पणत्या-दिवे रंगविण्यात व्यस्त

दिवाळीचा सण म्हटले तर रोषणाई, पणत्या, दिवे अशा अनेक प्रकारे झगमगाट करून साजरा केला जातो. मात्र, दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या व दिवे आता देह व्यापार करणाऱ्या महिला मातीच्या पणत्या रंगसंगतीन सजवित आहेत. त्या संस्थेच्या माध्यमातून विक्री करीत आहेत

women in  prostitution work
women in prostitution work
author img

By

Published : Oct 26, 2021, 4:38 PM IST

Updated : Oct 26, 2021, 4:53 PM IST

ठाणे - देह व्यापार करणाऱ्या महिलांच्या वस्तीत शरीर सुखासाठी जाणाऱ्या ग्राहकांना खुणावणारे हात नजरेस पडतात. परंतु भिवंडी शहरातील हनुमान टेकडी परिसरात जिल्ह्यातील सर्वात मोठी देहव्यापार करणाऱ्या याच वस्तीतील २५हून देह व्यापार करणाऱ्या महिलां विधायक कामात गुंग झाल्या आहेत.

श्री साई सेवा संस्थेच्यावतीने दिवाळीसाठी पणत्या व दिवे रंगवून विक्री करण्याची संधी देह व्यापार करणाऱ्या महिलांना देण्यात आली. त्यामधून त्यांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे देह व्यापारासाठी खुणावणारे हात आता पणत्या, दिवे रंगविण्यात व्यस्त झाले आहेत.

पणत्या-दिवे रंगविण्याचे काम सुरू
पणत्या-दिवे रंगविण्याचे काम सुरू

हेही वाचा-Drug Case : डीलशी माझा संबंध नाही, सत्य समोर आणणार - प्रभाकर साईल

महिलांनी रंगविले ५ हजार पणत्या व दिवे-
दिवाळीचा सण म्हटले तर रोषणाई, पणत्या, दिवे अशा अनेक प्रकारे झगमगाट करून साजरा केला जातो. मात्र, दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या व दिवे आता देह व्यापार करणाऱ्या महिला मातीच्या पणत्या रंगसंगतीन सजवित आहेत. त्या संस्थेच्या माध्यमातून विक्री करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रयत्नातून तब्बल ५ हजार पणत्या व दिवे विक्रीसाठी तयार आहेत.

देह व्यापारासाठी खुणावणारे हात पणत्या-दिवे रंगविण्यात व्यस्त

हेही वाचा-तेलंगणा : 3 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश; एके-47 रायफल ताब्यात

देह व्यापार करणाऱ्या महिलांमध्ये जनजागृती व समुपददेशन
मागील चार वर्षात या भागातील महिलांमध्ये श्री साई सेवा संस्था आरोग्य शिक्षण, जनजागृती व समुपदेशन करण्यात आले. या कार्यातून येथील २५ हून अधिक महिलांना या नरकयातना भोगायला लागणाऱ्या देह व्यापाराच्या व्यवसायापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना व्यवसायाची संधी श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती सिंग खान यांनी दिली आहे. या कामांमुळे महिला सहजरित्या हाताने पणत्या व दिवे रंगविण्यात गर्क झाले आहेत.

हेही वाचा-Aryan Khan Drug Case LIVE : NCB कडून आर्यनच्या जामिनाला जोरदार विरोध, पुराव्यांशी छेडछाडीचा दावा

Last Updated : Oct 26, 2021, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.