ETV Bharat / city

CCTV : आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे वाचले प्राण - रेल्वे अपघात

बेलापूर येथे राहणाऱ्या तूनुगुंटला रेखा या भुवनेश्वर येथे जाण्यासाठी बुधवारी दुपारी कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या. तेव्हा त्यांचा पाय घसरून फलाटावर पडल्या. तेव्हा तेथील आरपीएफ जवानाने महिलेचे प्राण वाचले.

महिलेचे वाचले  प्राण
महिलेचे वाचले प्राण
author img

By

Published : Sep 30, 2021, 4:49 PM IST

Updated : Oct 2, 2021, 5:31 PM IST

ठाणे - कल्याण रेल्वे स्थानकाच्या ४ नंबर फलाटावर चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिलेला एका आरपीएफ जवानाने रेल्वे खाली जाण्यापासून वाचविल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्यापाठोपाठ शनिवारी चालत्या ट्रेनमधून लगेज देण्याच्या नादात काकांना सोडण्यासाठी आलेला तरुण ट्रेनमधून पडल्याची घटना समोर आली आहे.

आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे महिलेचे वाचले प्राण

त्याचे नशीब बलवत्तर म्हणून फलाटावर कर्त्यव्य बजाविणाऱ्या दोन आरपीएफ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळातच धाव घेऊन त्याला ट्रेन खाली जाण्यापासून बचावले. रमाशंकर पुरुषोत्तम पाल, (वय ४८ वर्ष ) असे जीव वाचलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राधिका सेन आणि वैशाली पटेल असे आरपीएफ महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

दोन महिलांनी वाचवले प्राण

बॅगसह तोल जाऊन पडला खाली
कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी गावी जाण्यासाठी रमाशंकर हा त्याचे काका चंद्रपाल सतइपाल यांना सोडण्यासाठी आला होता. त्यावेळी ४ नंबर फलाटावर गोदान एक्स्प्रेस आली असता, चंद्रपाल सतइपाल हे गोदान एक्स्प्रेस चढले. मात्र, त्यांची बॅग खालीच राहिली. तर तितक्यातच ट्रेन स्थानकातून सुटली. त्यामुळे रमाशंकर काकाची बॅग देण्याच्या नादात तो चालत्या ट्रेनमध्ये चढला. बॅग वजनदार असल्याने त्याचा तोल जाऊन तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला.

रेल्वे प्रशासनकडून प्रवाशांना आव्हान
रमाशंकर पडल्याचे पाहून ड्युटी तैनात असलेल्या आरपीएफ कर्मचारी राधिका सेन आणि वैशाली पटेल यांनी क्षणांचा विलंब न लावता त्याच्याकडे धाव घेत ट्रेन खाली जाण्यापासून वाचवले. ही घटना ट्रेन मधील इतर प्रवाशांनी पाहिली. आणि ट्रेन थांबवली. या दोन्ही घटनेनंतर प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून चालत्या ट्रेन मध्ये चढू वा उतरू नये, असे आव्हान करण्यात आले आहे.

हेही वाचा - भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चोप, राज्यात शिवशाही आहे का तानाशाही? - आशिष शेलार

दुसऱ्या ट्रेनमध्ये बसल्याने घडला प्रकार
नवीमुंबईतील बेलापूर येथे राहणाऱ्या तूनुगुंटला रेखा या भुवनेश्वर येथे जाण्यासाठी बुधवारी दुपारी कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या. कोणार्कच्या एेवजी कामायनी एक्सप्रेसमध्ये बसल्या. कल्याणहून फलाट क्र. 4 वरून एक्सप्रेसमध्ये उतरताना त्यांचा पाय घसरला. आणि त्या फलाटावर पडल्या. या वेळेस आरपीएफ कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत त्या महिलेला बाहेर काढत जीव वाचवला. आरपीएफ जवानाने दाखवलेल्या धाडसामुळे एका महिलेचे प्राण वाचले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

हेही वाचा - मुंबईत आणखी एका संशयित दशतवाद्याला अटक, एटीएसची कारवाई

Last Updated : Oct 2, 2021, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.