ETV Bharat / city

मनसुख हिरेन यांचे ते दोन मोबाईल गेले कुठे..? मुख्य धाग्याकडे तपास यंत्रणांचे दुर्लक्ष

author img

By

Published : Mar 14, 2021, 7:47 PM IST

मनसुख हिरेन प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मात्र मनसुख हिरेन यांचे गायब झालेले ते दोन मोबाईल कुठे आहेत, याचा शोध लावण्यात दोन्ही यंत्रणेला अद्याप यश आले नाही. या मोबाईलवरून अनेक खुलासे समोर येण्याची शक्याता आहे. पण तपासाचा हा मुख्य धागाच अजून मिसिंग आहे.

-mansukh-hiren
-mansukh-hiren

ठाणे - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा खाडीत मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या मृत्यूवरून राजकारण तापले आहे. हिरेन प्रकरणावरून केंद्र आणि राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. या वादाचा पहिला दणका मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांना बसला असून काल त्यांना एनआयएने अटकही केली.

एकीकडे एनआयए आणि दुसरीकडे मुंबईचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या दोघांच्या तपासाचा वेग कमालीचा वाढला आहे. रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मात्र मनसुख हिरेन यांचे गायब झालेले ते दोन मोबाईल कुठे आहेत, याचा शोध लावण्यात दोन्ही यंत्रणेला अद्याप यश आले नाही. या मोबाईलवरून अनेक खुलासे समोर येण्याची शक्याता आहे. पण तपासाचा हा मुख्य धागाच अजून मिसिंग आहे.

मनसुख हिरेन यांचे ते दोन मोबाईल गेले कुठे..?

हे ही वाचा - ममता बॅनर्जींवर हल्ला नव्हे अपघात; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मनसुख यांचा ऐवज गायब -

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारची चौकशी सुरु असतानाच कार मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्चला मुंब्रा खाडीत मृतदेह सापडला. तेव्हापासून या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्या दिवशी मनसुख यांनी घर सोडले तेव्हा त्यांच्याकडे दोन मोबाईल, ५ ते ६ क्रेडिट कार्ड, अंगावर सोन्याची चैन आणि हाताच्या बोटात आंगठी होती. मात्र ज्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला तेव्हा हा सर्व ऐवज गायब होता. एटीएसने केलेल्या तपासात आणि मिळालेल्या सीडीआर, मोबाईल लोकेशनवरून हिरेन त्या दिवशी वसईतील मांडावी येथे गेले होते. तेथूनच ४० किमीच्या अंतरावर मनसुख यांचा मृतदेह सापडला. आता सीडीआरवरून मनसुख कुणाच्या संपर्कात होते याचा तपस सुरू आहे. पण मोबाईल सापडल्यास या संदभात अनेक खुलासे होऊ शकतात. दुसरीकडे गायब झालेल्या क्रेडिट कार्डचाही अजून कुणी वापर केलेला आढळून आलेला नाही. त्यामुळे निव्वळ चोरीसाठी हा ऐवज गायब झालेला नाही, हे स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा - Ind vs Eng २nd T२० : नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
विरार लोकेशन धूळफेक करण्यासाठी -

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला, मात्र त्याच्या आधी काही तासापूर्वीचे लोकेशन विरार-वसई परिसरातील मांडवी गाव हे होते हे लोकेशन जाणून-बुजून धूळफेक करण्यासाठी निर्माण केले होते का, असा संशय बळावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.