ठाणे - शहरातील रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत गजबजलेल्या परिसरात असलेल्या भाजप गटनेत्यांचे कार्यालय अज्ञात इसमांनी फोडल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांचे कार्यालय दोन अज्ञात इसमांनी दंडुक्यांच्या सहाय्याने फोडले. सायंकाळी अचानक घडलेल्या या प्रकाराने रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नसली तरी कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हा संपूर्ण प्रकार तिथे लावलेल्या cctv मध्ये कैद झाला असून दोन्ही हल्लेखोरांचे चेहरे या cctv फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. आपले कोणाशीही वैयक्तिक पातळीवर वैर नसून हा हल्ला का करण्यात आला याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचे स्वतः वाघुले यांनी सांगितले. घटनास्थळी पोहोचलेल्या नौपाडा पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही हस्तगत केले असून त्या अनुषंगाने तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि या प्रकरणाच्या मागे कोणाचा हात आहे याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी वाघुले यांनी केली आहे. आपण गेली 18 वर्षे एकटेच फिरत असून आपण पोलीस संरक्षण घेणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.
संजय वाघुले यांनी अनेक घोटाळ्यांना फोडली आहे वाचा -
भाजपा गट नेते संजय वाघुले यांनी आतापर्यन्त पालिकेतील अनेक घोटाले उघड़किस आणले आहेत. त्याच्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या प्रकारचे आणाखी पुरावे गोळा करण्यास सुरवात केली असुन हल्लेखोंरांचा शोध लवकरच लागेल असा विश्वास पोलिसांना आहे.