ETV Bharat / city

ठाणे : अंबरनाथ शहरात मुसळधार पावसाने कोसळली भिंत; दोन जणांचा मृत्यू

मुसळधार पावसाने नगरपालिकेच्या उद्यानाची संरक्षक भिंत लगतच्या घरावर कोसळून दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

मुसळधार पावसाने कोसळली भिंत
मुसळधार पावसाने कोसळली भिंत
author img

By

Published : Oct 7, 2021, 12:09 AM IST

Updated : Oct 7, 2021, 5:01 AM IST

ठाणे - मुसळधार पावसामुळे अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मीननगर गॅस गोडाऊन परिसरात नगरपालिका उद्यानाची आरसीसी बांधकामाची सुरक्षा भिंत कोसळली. ही भिंत अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोविंद केसरकर (३८), प्रविण कदम (३०) अशी जागीच मृत्यू झालेल्या नागरिकांची आहेत. काही नागरिक जखमी झाले आहेत.

अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मी नगर परिसरातील गॅस गोडाऊन समोरील भागात नगरपालिकेच्या उद्यानाची आरसीसी बांधकामाची सुरक्षा भिंत उभारण्यात आली होती. मात्र, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत अचानक कोसळली. आरसीसी बांधकाम असलेल्या या सुरक्षा भिंतीचे दगड आणि राडारोडा थेट खाली असलेल्या घरे आणि पादचारी यांच्यावर कोसळले. या घटनेत गोविंद केसरकर, प्रविण कदम या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

अंबरनाथ शहरात मुसळधार पावसाने कोसळली भिंत

हेही वाचा-मराठा व ओबीसींच्या आरक्षणाबाबत दुटप्पी धोरणामुळे जि.प. पोटनिवडणुकीत भाजपला फटका - अशोक चव्हाण

मदत कार्यातही मोठी अडचण

घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दल आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही मृतदेह तात्काळ उल्हासनगरमधील साशकीय मध्यवर्ती रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातच मुसळधार पावसामुळे या परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला. त्यामुळे अग्निशमन दलाला मदत कार्यातही मोठी अडचण होत असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनवणे यांनी दिली आहे.

हेही वाचा-Cruise Drug Case : अरबाज मर्चंटला ताब्यात घेणारा भाजपचा नेता; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

Last Updated : Oct 7, 2021, 5:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.