ठाणे - तेलंगणा राज्यातून ठाण्यात अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या दुकलीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सापाळा रचून अटक केली. त्यांच्याकडून १२ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. ही कारवाई ९ मार्चला करण्यात आली आहे.
यात अनिल नारायणा टप्पानिल(२८ रा. गाव-नारायणखेडा संगारेड्डी, तेलंगणा) आरोपी सुभाष रामचंद्रय्या गुरुगुला(४३ रा. गड्डीपेढापूर. पेढापूरमेडक , जि - संगारेड्डी तेलंगणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल केला. े
केसल मिल परिसरात कारवाई-
ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला केसल मिल येथील अभिरुची बसस्टॉपवर एक व्यक्ती गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी खातरजमा करून सापळा रचला. तेव्हा मिळालेल्या माहिती प्रमाणे घटनास्थळावर एक आरोपी संशयास्पद रित्या वाट पाहत असल्याचे पथकाच्या निदर्शानास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. तर चौकशी अंती अन्य एकास अटक करण्यात आली आहे.