ETV Bharat / city

Fake Call : रेल्वे स्थानकावर बॅगेत बॉम्ब ठेवल्याच्या कॉल; पोलिसांची रात्रभर पळापळ, कॉल करणारे दोघेही अटक

अंबरनाथ रेल्वे स्थानकात ( Ambernath railway station ) एका बॅगध्ये बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ताबडतोब बॉम्बशोधक पथक, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, रेल्वे स्थानकात सुमारे १५० लोहमार्ग पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या घटनास्थळी पोहोचले होते. ( Two Arrested for fake call in Ambernath )

Ambernath railway station
रेल्वे स्थानकावर बॅगेत बॉम्ब ठेवल्याच्या कॉल
author img

By

Published : Jul 4, 2022, 10:12 PM IST

ठाणे - अंबरनाथ रेल्वे स्थानकात ( Ambernath railway station ) एका व्यक्तीने बॅगेत बॉम्ब ठेवल्याचे सांगून रेल्वे पोलिसांची रात्रभर झोप उडवली होती. कॉलचे गांभीर्य पाहून कॉल करणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आज सोमवारी अटक ( Two Arrested in Fake Call ) केली. अतुल प्रजापती, (वय २७ ) आणि प्रदीप प्रजापती (वय २८) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून दोघेही कळवा भागात राहणारे रहिवासी आहेत. ( Two Arrested for fake call in Ambernath )

रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची कॉल - रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास एका कॉलरने रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका बॅगध्ये बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ताबडतोब बॉम्बशोधक पथक, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, रेल्वे स्थानकात सुमारे १५० लोहमार्ग पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे पोलीस पथकाने प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची आणि प्रवाशांची तपासणी केली. तर दुसरीकडे तांत्रिक पथकाने मोबाईल नंबर वरून कॉलरचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला असता कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव अतुल प्रजापती असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर अतुलचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला कळवा भागातून ताब्यात घेतले असता त्याच्या मोबाईलवरून रेल्वे हेल्पलाइनवर बोलणाऱ्या त्याच्या मित्राचे नाव समोर आले. त्यानंतर प्रदिप प्रजापतीलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली.

दोघांना अटक - कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अविनाश आंधळे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, "सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांचे संपूर्ण पथक स्टेशनवर होते आणि सर्वत्र तपासणी करत होते. नंतर आम्ही दोघा भामट्यांना अटक केली. हे दोघेही कळवा भागात राहणारे असून दोघेही खाजगी कंपनीत काम करतात व त्यांना दारूचे व्यसनही आहे. रविवारी त्यांची दारूची पार्टी केल्यानंतर त्यांनी अशी खोटी माहिती देऊन पोलिसांना अडचणीत आणल्याने दोघांवरही गुन्हा दाखल करून आज सायंकाळी अटक केली आहे. त्या दोघांही रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हेंच्या हत्येसाठी आरोपींना दहा हजार रुपये; पोलीस आयुक्त सिंह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.