ETV Bharat / city

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 611 वर, शुक्रवारी सापडले 51 रुग्ण

ठाण्यात रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने ठाणे पालिकेला ही धोक्याची घंटा ठरत आहे. ठाण्यात कोरोनांची लागण होऊन प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा 477 एवढा असून 1488 लोक आतापर्यंत क्वारंटाईन आहेत. पालिका प्रशासनाने आतापर्यंत 6627 एवढ्या कोरोनाच्या चाचण्या घेऊन नमुने घेतले आहेत.

corona
corona
author img

By

Published : May 9, 2020, 10:18 AM IST

ठाणे - मागील तीन दिवसांपासून मोठ्या संख्येने कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा आकडा रोज वाढत आहे. शुक्रवारी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळल्याने ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 611 वर पोहचला आहे. ठाण्यात कोरोनाचा गुणाकार होत असल्याची धोक्याची घंटा वाजत आहे.

संदीप माळवी उपायुक्त ठाणे महानगरपालिका

गुरुवारी कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 560 वर असतानाच शुक्रवारी तब्बल 51 नवे रुग्ण आढळल्याने एकदा 611 पार झालेला आहे. शुक्रवारी माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत गुरुवारपर्यंत 30 रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी मात्र 3 रुग्ण आढळल्याने आकडा 33 वर गेला. . वर्तकनगर प्रभाग समितीत गुरुवार पर्यंत 42 रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी मात्र एकही रुग्ण या प्रभाग समितीत आढळला नाही. लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समितीत आतापर्यंत गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा 141 वर होता. शुक्रवारी 15 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. या प्रभाग समितीत रुग्णांची संख्या 156 वर पोहचली. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत गुरुवार पर्यंत 58 रुग्ण होते. त्यात शुक्रवारी 2 रुग्णांची भर पडली रुग्णांची संखया 60 वर पोहचली आहे. उथळसर प्रभाग समितीत गुरुवारपर्यंत 48 एवढे रुग्ण होते. शुक्रवारी एकही रुग्ण आढळला नाही. वागळे प्रभाग समितीत रुग्णांचा आकडा 96 वर होता. त्यात शुक्रवारी 14 रुणांची भर पडल्याने आकडा शंभरी पार 110 वर पोहचला.

कळवा प्रभाग समितीत रुग्णांचा आकडा 50 होता त्यात 1 ने भर पडली असून शुक्रवारी आकडा 51 एवढा होता. मुंब्रा प्रभाग समितीत रुग्णांचा आकडा 72 वर होता. त्यात 4 नव्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 76 वर पोहचला. दिवा प्रभाग समितीत रुग्णांचा आकडा 23 वर होता. नव्या रुग्णांची 12 ने वाढ झाल्याने हा आकडा 35 वर पोहचला.

दरम्यान, ठाण्यात रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने ठाणे पालिकेला ही धोक्याची घंटा ठरत आहे. ठाण्यात कोरोनांची लागण होऊन प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा 477 एवढा असून 1488 लोक आतापर्यंत क्वारंटाईन आहेत. पालिका प्रशासनाने आतापर्यंत 6627 एवढ्या कोरोनाच्या चाचण्या घेऊन नमुने घेतले आहेत. आतापर्यंत पालिका प्रशासनाला 6, 174 नमुन्यांचे अवहाल प्राप्त झालेले आहेत. तर एकंदर ठाण्याच्या विविध प्रभाग समितीत आढळलेल्या कोरोनाबधितांची संख्या शुक्रवारी 611 वर पोहचली आहे. आरोग्य विविध संघटनांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात कोरोनांची मोठी लाट येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, ठाण्यात पावसाळ्याच्या एक महिन्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची लाट आल्याचे चित्र दिसत आहे. येणाऱ्या पावसाळ्यात ठाणे पालिका प्रशासनाला कोरोना लाटेला थोपविण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.