ETV Bharat / city

ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणारे तिघे गजाआड, दोन अभिनेत्रींची रवानगी सुधारगृहात - Rescued two actresses from sex racket

ठाणे शहरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या घरमालकीणीसह दोन एजंट यांना ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. यात सहभागी असणाऱ्या दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

sex racket in Thane
ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणारे तिघे गजाआड,
author img

By

Published : Jun 3, 2021, 8:16 PM IST

Updated : Jun 4, 2021, 1:32 PM IST

ठाणे - बुधवारी ठाणे गुन्हे शाखेने पाचपाखाडी येथील प्लॅटमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. एक घर मालकीण, एक महिला एजंट आणि एक पुरुष एजंट आणि दोन अभिनेत्री अशा पाच जणांना अटक करण्यात आली. गुरुवारी गुन्हे शाखेने घुमजाव करीत दोघी अभिनेत्रीना रेस्क्यू केले अशी भूमिका मांडली आहे. तर अनैतिक धंदा चालविल्या प्रकरणी घरमालकीण, महिला आणि पुरुष एजंट अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोन अभिनेत्री याना मात्र सुधारगृहात रवाना केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे यांनी दिली. तर तीन आरोपीना न्यायालयाने ७ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणारे तिघे गजाआड,

बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

२ जून रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचपाखाडी, नौपाडा परिसरात एक महिला सिने अभिनेत्री आणि मॉडेल पुरविते, ग्राहकांकडून पैसे घेऊन तिच्या घरी वेश्यागमनासाठी जागा उपलब्ध करून देते अशी माहिती मिळाली होती. त्या आधारे बुधवारी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून अमृतनगर मुंब्रा येथे राहणाऱ्या महिला एजंटकडे २ अभिनेत्री आणि मॉडेलची मागणी केली. पाहिलेने प्रत्येकी २ लाख रुपयांची मागणी केली. तर तडजोडीत रक्कम १ लाख ८० हजारावर निश्चित करण्यात आली. सदर महिला एजंटने विशाल उर्फ सुनीलकुमार उत्तमचंद जैन(४२) रा. शास्त्रीनगर, गोरेगाव याच्या मार्फत दोन अभिनेत्रींना वेश्यागमनासाठी त्यांना पैशाचे आमिष दाखवून प्रवृत्त केले. तर या मुलींना पाचपाखाडी नौपाडा येथील घरी बोगस ग्राहकांसोबत पाठविल्या. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने केलेल्या छापेमारीत पोलीस पथकाला दोन अभिनेत्री, एक महिला एजंट, एक पुरुष एजंट आणि ज्या घरात वेश्यागमन होते त्या घराची मालकीण अशा पाच जणांना ताब्यात घेतले. पोलीस पथकाने सदर कारवाईत २ लाख १४ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, वस्तू, पर्स, निरोधची पाकिटे आणि रोख रक्कम हस्तगत केले.

अटक तीन आरोपीच्या विरोधात गुन्हे शाखेने आपसात संगनमत करून वेश्याव्यवसायाद्वारे मिळणाऱ्या आर्थिक उत्पनावर उपजीविका करून अपव्यवहार करीत असताना सापडल्याने कलम ३७०(२),(३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम सन १९५६ चे कलाम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

आर्थिक अडचणी मुळे शोषण

गरिबी, मजबुरीमुळे वेश्या व्यवसायाकडे काही लोक वळतात. मात्र कदाचित त्या महिलांना हे माहित नसते, की भविष्यात त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचे चित्रण होऊ शकते याची दाट्त शक्यता आहे. तेव्हा आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अशा प्रकारे कुणीही फसू नये. त्याचा परिणाम हा महिलांच्या पुढील आयुष्यावर पडू शकतो.

अटक आरोपीमध्ये कॅमरामन

या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींमध्ये एका कॅमरामनचा समावेश आहे, तो मध्यस्तीचे काम करत होता. त्याने किती लोकांच्यासोबत असे प्रकार केले आहेत हे आता गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत.
हेही वाचा - कोविड नियम उल्लंघनासाठी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी वर गुन्हा दाखल

Last Updated : Jun 4, 2021, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.