ठाणे : ठाण्याच्या वाघबीळ परिसरात राहणाऱ्या ५८ वर्षीय सेवानिवृत्त फिर्यादीला मोबाईल केवायसी करा अन्यथा सिमकार्ड बंद होईल अशी बतावणी करीत मोबाईलमध्ये दोन अॅप्स डाउनलोड करण्यास सांगून तब्बल बँक खात्यातून १६ लाखाचा चुना लावल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात (Kasarwadvali Police Station) दाखल करण्यात आलेली आहे.
वाघबीळ नाका दलाल इंजि. समोर राहणाऱ्या ५७ वर्षीय फिर्यादीला त्यांच्या फोन आला. त्याने मोबाईल क्रमांक हा केवायसी करून घ्या अन्यथा मोबाईल सीम रद्द होईल. आहि बतावणी करीत केवायसी किवीक सपोर्ट हे ऍप डाउनलोड करण्यास सांगून फिर्यादीच्या डेबिट कार्डची संपूर्ण माहिती मिळवून १० रुपये डेबिट करण्यासाठी पाठविलेला ओटीपी नंबर मिळवला. आणि फिर्यादीच्या खात्यातून तब्बल १६ लाख १० रुपये काढून घेत गंडा घातला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक तपस करीत आहेत.
हेही वाचा - Gang Rape In Mumbai : मुंबईत तरुणीचे तोंड दाबून चौघांनी आळीपाळीने केला सामूहिक बलात्कार