ठाणे श्रावण Shravan मास सुरू झाला की, नागरिकांची मोठ्या प्रमाणात धाव सुरू होते. ती पौष्टिक व पारंपारिक आहाराकडे. त्यातच पावसाळ्यात पिकणारा रानमेवा Shravan Special Monsoon vegetables हा खाण्यासाठी तर नागरिकांना वेगळीच ओढ लागलेली असते. श्रावण महीन्यात प्रामुख्याने पूजाअर्चा तसेच उपवास देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे नागरिकांचा कल पालेभाज्या खाण्याकडे असतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या Monsoon vegetables निघतात. याचेच महत्त्व लक्षात घेऊन ठाण्यात देखील मोठी मागणी huge demand for Monsoon vegetables या रानभाज्यांना आल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहराला लागून असणाऱ्याच खेडोपाड्यातून तसेच आदिवासी वस्तीतून मोठ्या प्रमाणात रानभाज्या या ठाणे शहरात येत असतात. व याच रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी, ठाणेकरांची एकच झुंबड लागलेली असते. आहारात पौष्टिकता असावी यासाठी आपण तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ बनवत असतो. परंतु पावसाळ्यात निसर्गाकडूनच मिळणाऱ्या या रानमेव्या मुळे पौष्टिकता अजूनच वाढली जाते. त्यामुळे पावसाळ्यात प्रामुख्याने रानभाज्या खाल्या जातात. रान भाज्या या शरीरासाठी उत्तम असून यात मोठ्या प्रमाणात पौष्टिकता तसेच अनेक गुणधर्म देखील असतात. त्यामुळेच नागरिकांचा कल हा वाढलेला असून बाजारात देखील नागरिक याच भाज्यांची मागणी करत आहेत. पावसाळ्यात पिकणारे प्रामुख्याने टाकळा, बोरशी, बारंगा बारनी, बाभली, मेथी, खायचा आळु, वडीचा आळु, हळदीची पाने, कंटोली, शेपु अशा अनेक भाज्या या पावसाळ्यात नागरिकांना खायला आवडतात. व यामुळे याचा खप देखील मोठ्या प्रमाणात आहे.
श्रावणातल्या भाज्यांची विशेष मागणी श्रावण हा सणांचा महिना मानला जातो. याच सणात अनेकांचे उपवास देखील असतात. त्यामुळे पालेभाज्यांची मागणी देखील वाढलेली असते. वर्षभरात या भाज्या कुठेही मिळत नसून, फक्त पावसाळ्यातच या भाज्या पिकत असल्याने, त्या नागरिकांनी खाल्ल्या पाहिजेत व यामुळे आहारात पौष्टिकता देखील उपलब्ध होते. त्यामुळेच या भाज्यांचे सेवन आम्ही देखील करतो. थोडाफार प्रमाणात या काहीसे महाग असतात, परंतु वर्षभरातून एकदा मिळणाऱ्या या भाज्यांचा आस्वाद काहीसा वेगळाच असल्याकारणाने या भाज्या सेवन केल्या जातात.
ठाणे शहरात या रानभाज्यांची आवक असून नागरिकांकडून देखील याची मागणी मोठ्या प्रमाणात होते. या भाज्या पौष्टिक असल्या कारणाने यातून शरीराचे आजार देखील दूर होतात. आजवर अनेक आजारांवर या रानभाज्यांनी मात केलेली आहे. त्यामुळे वर्षभरात कधीही न मिळणाऱ्या भाज्या या फक्त पावसाळ्यात उपलब्ध होत असल्याने, प्रत्येक नागरिकांनी या भाज्यांचा आस्वाद घ्यावा. असा सल्ला यावेळी भाजी विक्रेत्यांनी देखील दिलेला आहे.