ETV Bharat / city

घरात राहू न दिल्याने मित्राच्याच पोटात भोसकला चाकू; प्रकृती चिंताजनक - thane crime

इंद्रमोहन याने केलेला वार इतका भयानक होता की त्यामुळे पद्मबहादुर च्या पोटातील आतडेच बाहेर आले. हल्ला केल्यानंतर इमारतीतून बाहेर पडलेल्या इंद्रमोहन याला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ताब्यात घेतले व पद्मबहादूर याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पद्मबहादूरवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

घरात राहू न दिल्याने मित्राच्याच पोटात भोसकला चाकू

author img

By

Published : Oct 24, 2021, 8:15 AM IST

ठाणे - पोटातील आतड्या हाताने सावरत चालणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. हि घटना ठाण्यातील खारकर आळी या गजबजलेल्या भागात घडली. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खारकर आळी भागात नीलम हाउसिंग सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आणि पाणी सोडण्याचे काम करणारा 49 वर्षीय पद्मबहादुर थकोला हा आपल्या कुटुंबासहित इमारतीच्या खाली एका खोलीत राहतो. काल दुपारी त्याच्याच गावात राहणारा इंद्रमोहन भारमले बुडा हा पद्मबहादूर याच्या घरी आला व आपल्याला त्याच्या घरात राहायला देऊन आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. पद्मबहादूर याने या गोष्टीस नकार देताच त्यांच्यात मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात इंद्रमोहन याने भाजी कापायचा सुरा घेऊन पद्मबहादूर याच्या पोटात खुपसला.

इंद्रमोहन याने केलेला वार इतका भयानक होता की त्यामुळे पद्मबहादुर च्या पोटातील आतडेच बाहेर आले. हल्ला केल्यानंतर इमारतीतून बाहेर पडलेल्या इंद्रमोहन याला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ताब्यात घेतले व पद्मबहादूर याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पद्मबहादूरवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर आरोपी इंद्रमोहन याच्यावर कलम 307 नुसार ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे.

स्वतः जखमी गेला रुग्णालयात -

हा हल्ल्यात जखमी झालेला पद्मबहादूर हा स्वतः हल्ला झाल्यानंतर रक्ताळलेल्या अवस्थेत चालत जाऊन रिक्षात बसून रुग्णालयात गेला नागरिकांनी कंट्रोल रूमला कळवल्या त्यानंतर आरोपीना अटक करण्यात आली आता जखमी झाल्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.