ETV Bharat / city

ST Strike ठाण्यात आंदोलन करणारा एसटी कर्मचारी ब्रेन हेमरेजने रुग्णालयात दाखल - ST employee Sandip Dhamal

एकीकडे एसटी कर्मचारी विलीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आंदोलनादरम्यान ४० कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. मानसिक तणावामुळे अनेक कर्मचारी रुग्णालयात दाखल होत आहेत.

एसटी कर्मचारी
एसटी कर्मचारी
author img

By

Published : Nov 25, 2021, 10:16 PM IST

Updated : Nov 25, 2021, 11:08 PM IST

ठाणे - ठाण्यात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे ब्रेन हेमरेज झाले आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवण्याची शपथ घेतली आहे.

एकीकडे एसटी कर्मचारी विलीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आंदोलनादरम्यान ४० कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. मानसिक तणावामुळे अनेक कर्मचारी रुग्णालयात दाखल होत आहेत.

हेही वाचा-Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची ७ तास चौकशी

अतिदक्षता विभागातील उपचाराकरिता 10 लाखांचा होणार खर्च

खोपट बस डेपोत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी असलेले एसटी कामगार संदीप ढमाळ यांना आंदोलनादरम्यान मंगळवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ढमाळ यांच्या डोक्याची नस फाटून त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना घडली आहे. संदिप ढमाळ यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यासाठी १० लाखांचा खर्च लागणार आहे.

हेही वाचा-Anna Hajare admitted in hospital अण्णा हजारे उपचाराकरिता रुबी हाॅल रुग्णालयात दाखल

एसटी कर्मचाऱ्याचा राज्य सरकारने खर्च करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी-

एसटी महामंडळ आणि राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप एसटी कर्मचारी करत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हा सर्व खर्च उचलून संदिप ढमाळ यांचा जीव वाचवावा अशी मागणी ठाण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा-Infant sale नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या डॉक्टरला बेड्या; 'हा' धक्कादायक प्रकार आला समोर

मृत कर्मचाऱ्यांचा विचार करा-

आंदोलना दरम्यान मृत पावलेल्या 40 कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकार काहीच बोलत नाही. त्यांना योग्य तो मोबदला दिला पाहिजे, अशी विशेष मागणी यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Last Updated : Nov 25, 2021, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.