ETV Bharat / city

व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Nov 17, 2021, 5:23 PM IST

Updated : Nov 17, 2021, 7:27 PM IST

महागडे अत्तर बनविण्यासाठी वापरली जाणारी 'अम्बर ग्रीस' अर्थात व्हेल माशाची उलटीसह (whale fish vomit) दोघांना श्रीनगर पोलिसांनी (thane police) अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मयूर मोरे आणि देवदास मोरे, असे अटकेत असलेल्या दोघांची नावे आहे.

छायाचित्र
छायाचित्र

ठाणे - महागडे अत्तर बनविण्यासाठी वापरली जाणारी 'अम्बर ग्रीस' अर्थात व्हेल माशाची उलटीसह (whale fish vomit) दोघांना श्रीनगर पोलिसांनी (thane police) अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मयूर मोरे आणि देवदास मोरे, असे अटकेत असलेल्या दोघांची नावे आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिलेली माहिती अशी की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 13 नोंव्हेंबरला रोड क्रं. 16 जवळ एका हॉटेलमध्ये सापळा रचला होता. त्या ठिकाणी व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या मयूर व देवसास यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून दोन किलो वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीची किंमत (whale fish vomit price) सुमारे एक कोटी रुपये प्रति किलो आहे. ही उटली त्यांनी कोठून आणली व कोणाला विकणार होते याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दोघांकडून उलटी व दुचाकी वाहन, असे दोन कोटी 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

व्हेल माशाची उलटी इतकी महाग का..?

या व्हेल माशाच्या उलटीचा वापर (whale fish vomit uses) उच्चप्रतीचे परफ्यूम किंवा अत्तर (whale fish vomit perfume) बनवण्यासाठी तसेच औषधामध्ये होतो. ही उलटी फार दुर्मिळ असते त्यामुळे तिची किंमत मोठी असते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची मोठी किंमत असते. त्यामुळे हे अम्बर ग्रीस म्हणजे समुद्रातील तरंगणारे सोने असल्याचे म्हटले जाते.

हे ही वाचा - लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना टीएमटी बसमध्ये 'No Entry', ठाणे पालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

Last Updated : Nov 17, 2021, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.