ETV Bharat / city

नौपाड्यात मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल, तरूणाला केले जखमी

ठाण्यात रिक्षाचालकांचा मुजोरपणा वाढल्याचे दिसत आहे. नौपाड्यात एका तरूणाला भाडे नाकारून त्याला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नौपाड्यात मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Aug 17, 2019, 1:50 PM IST

ठाणे - शहरातील रिक्षाचालकांचा मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका तरूणाला भाडे नाकारून त्याला जखमी केल्यानंतर रिक्षाचालकाने तेथून पळ काढला. या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौपाड्यात मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल, तरूणाला केले जखमी

तक्रारदार महेश धनावडे (रा. बोरिवली) हा १५ ऑगस्टला शिवशाही बसने बोरिवली येथून वागले इस्टेट येथे बहिणीच्या घरी रक्षाबंधनाचा आला होता. महेश हा खोपट येथे उतारल्यानंतर त्याने तेथील रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षा क्रमांक एमएच ०४ ६१०३ च्या रिक्षा चालकाला इंदिरा नगर येथे जाण्याबद्दल विचारले. तेव्हा रिक्षाचालकाने नकार दिला. यानंतर महेशने रिक्षावाल्यांची नेहमीचीच नाटके आहेत, असे म्हटल्यानंतर याचा राग आल्याने रिक्षाचालकाने महेश याची कॉलर पकडून त्याच्या कपाळावर रिक्षाची चावी मारली. यात महेशच्या कपाळाला जखम झाली. या दरम्यान एका बाईक चालकाने महेशला जवळच्या राबोडी पोलीस ठाण्यात नेले. राबोडी पोलिसांनी महेशला प्रथम सिव्हिल रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेऊन पूढील तपास करत आहे.

Intro:ठाण्यात पुन्हा रिक्षाचालकांचा मुजोरपणा-भाडे नाकारून तरुणाला केले जखमी
नौपाड्यात गुन्हा दाखल रिक्षावाल्याने केला पोबाराBody:

रिक्षाचे भाडे नाकारून प्रवाशाने नेहमीचीच नाटके रिक्षावाल्यांची आहेत असे म्हणताच मस्तवाल रिक्षा चालकाने रिक्षाची चावी कपाळावर मारून तरुणाला जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाण्याच्या खोपट परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार महेश धनावडे याने तक्रार दाखल केली असून रिक्षा नंबरवरून पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.
तक्रारदार महेश धनावडे(३६) रा, बोरिवली हा १५ ऑगस्ट रोजी शिवशाही बसने बोरिवलीवरून वागले इस्टेट येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी रक्षाबंधनाचा आला होता. सशिवशाही बसने महेश हा खोपट येथे उताराला त्याने खोपट येथील रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षा क्र एमएच ०४ ६१०३ च्या रिक्षा चालकाला इंदिरा नगर येथे येणार काय? तेव्हा रिक्षाचालक याने नकार दिला. तेव्हा रिक्षावाल्यांची नेहमीचीच नाटके असल्याचे म्हणाला. त्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाने महेश याची कोलार पकडून त्याच्या कपाळावर रिक्षाची चावी मारल्याने महेशच्या कपाळाला जखम झाली. त्यातून रक्त वाहू लागले. दरम्यान एका बाईक चालकाने महेशला राबोडी पोलीस ठाण्यात नेले. राबोडी पोलिसांनी महेशला प्रथम सिव्हिल रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचाहर करून नौपाडा पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपस आणि फरारी रिक्षाचालकांचा शोध पोलीस घेत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.